close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गाईच्या पोटातून काढलं तब्बल ५२ किलो प्लास्टिक

गाईवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना तब्बल साडे पाच तास लागले.

Updated: Oct 21, 2019, 08:10 PM IST
गाईच्या पोटातून काढलं तब्बल ५२ किलो प्लास्टिक

तमिळनाडू : चेन्नईमध्ये गायीच्या पोटातून तब्बल ५२ किलो प्लास्टिक बाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तामिळनाडूतील पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ, वेपरी येथील सर्जन वेलावन यांनी, गायीच्या पोटातून हे प्लास्टिक बाहेर काढले. या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांना तब्बल साडे पाच तासांचा अवघी लागला. गाईने अन्नाच्या शोधात कचऱ्यासह हे प्लास्टिकही खाल्ल्याचं बोललं जात आहे. 

शस्त्रक्रियेदरम्यान प्लास्टिक बाहेर काढताना डॉक्टरांना एक स्क्रू आणि एक नाणंदेखील सापडलं आहे. 

गाईवर शस्त्रक्रिया करणारे सर्जन वेलावन यांनी सांगितलं की, पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा झाल्याने गाईला त्रास होत होता. प्लास्टिकमुळे तिची दुध देण्याची क्षमताही कमी झाल्याचे ते म्हणाले. 

  

सध्या वेपरी येथे गाईवर उपचार सुरु आहेत. तिच्या तब्येतीत सुधारणा होण्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.