मुंबई : गेल्या आठवड्यात सोने खरेदीची चांगली संधी ग्राहकांना चालून आली होती. सोन्याचे दर गेल्या आठवड्यात साधारण 700 रुपये प्रति तोळे पेक्षा जास्त किंमतीने घसरले होते. तसेच चांदीतही प्रति किलो 1000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीची घसरण नोंदवली गेली आहे.
आज आठवड्याचा पहिला दिवस होय. दुपारी 12 वाजेपर्यंत मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX)मध्ये सोन्याचा भाव 47 हजार 137 रुपयांवर ट्रेड करत होता. हा दर कालपेक्षा 400 रुपयांनी जास्त आहे. तसेच MCXमध्ये चांदीचा दर 69 हजारापर्यंत ट्रेड करीत होते. म्हणजेच चांदीतही 650 पेक्षा जास्त रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.
मुंबईतील सोन्याचे दर
22 कॅरेट 44360 प्रति तोळे (वाढ + 200 रु.)
24 कॅरेट 45360 प्रति तोळे (वाढ + 200 रु.)
मुंबईतील चांदीचे दर
चांदी 67500 प्रति किलो
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा दर (MCX) 55 हजारांच्यावर गेले होते. तर रिटेल मार्केटमध्ये हाच भाव सर्व करांसह 59 हजारांपर्यंत पोहचले होते.
त्यामुळे अद्यापही सोन्याचे दर हे उच्चांकी भावापेक्षा 9 ते 10 हजार रुपयांनी कमी आहेत.
------------------------------
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)