रॉयल एनफिल्डच्या गाड्यांमध्ये होऊ शकतो शॉर्ट सर्किट; 2 लाखाहून अधिक युनिट रिकॉल

देशात सर्वात दमदार मोटारसायकल बनवणारी ऑटोमोबाईल कंपनी रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) नुकत्याच आपल्या काही मॉडेल्सला रिकॉल केले आहे

Updated: May 20, 2021, 08:17 PM IST
रॉयल एनफिल्डच्या गाड्यांमध्ये होऊ शकतो शॉर्ट सर्किट; 2 लाखाहून अधिक युनिट रिकॉल title=
representative image

नवी दिल्ली : देशात सर्वात दमदार मोटारसायकल बनवणारी ऑटोमोबाईल कंपनी रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) नुकत्याच आपल्या काही मॉडेल्सला रिकॉल केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, इग्निशन कॉईलमधून मिसफायरिंग (Short Circuit) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोटारसायकलच्या परफॉमन्सवर परिणाम होईल.

या तीन मॉडेल्समध्ये अडचणी
बुलेट 350, क्लासिक 350, मेटेओर 350 या मोटारसायकलच्या 2 लाख 36 हजार युनिट्स परत घेण्याचा निर्यण रॉयल एनफिल्डने घेतला आहे. हा रिकॉल भारत, थायलँड, इंडोनेशिया, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, न्युजीलँड आणि मलेशियात विकलेल्या मोटारसायकलबाबत घेण्यात आला आहे.

मोटारसायकलची तपासणी आणि दुरूस्ती मोफत होणार
कंपनीने म्हटले आहे की, मोटारसायकलमध्ये असलेल्या अडचणी नियमित अंतर्गत चाचण्यांच्या दरम्यान समोर आली. त्यामुळे मोटारसायकलची मोफत दुरूस्ती करण्यात येणार आहे. ज्या मोटारसायकलचे निर्माण 2020 आणि एप्रिल 2021च्या दरम्यान करण्यात आले आहे.  त्या मोटारसायकलची दुरूस्ती केली जाणार आहे.

रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलरशिपचा संबधित मोटारसायकलधारकांना कॉल येऊ शकतो. त्यानंतर मोटारसायकलचा VIN च्या आधारे दुरूस्ती करण्यात येणार आहे.