गुडगाव : प्रद्युम्न ठाकुर हत्या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट येत आहेत. या हत्याकांडात सीबीआयने अटक केलेल्या ११ वी चा विद्यार्थी सतत आपल्या कबुली जबाबात घुमजाव करत आहे.
दोन दिवसांपूर्वी जुवेनाइल जस्टिस बोर्डाने सांगितले की, आरोपीने प्रद्युम्नच्या हत्येची कबूली दिली आहे. तसेच त्याने हत्या कशी केली याची माहिती देखील दिली. मात्र आरोपी आता आपला कबुली जबाब बदलताना दिसत आहे. आणि आता चाइल्ड प्रोटेक्शन अधिकारीने सांगितले की, या ११ वीच्या विद्यार्थ्याला मुद्दामून यामध्ये अडकवलं जातं आहे. तो आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करत आहे.
आरोपीच्या वडिलांनी सीबीआयवर आरोप केले आहेत की, त्यांच्या मुलाला या प्रकरणात मुद्दामून फसवलं जातं आहे. त्याने हा गुन्हा मान्य करावा म्हणून त्यावर दबाव टाकला जात आहे. जर तू हा गुन्हा मान्य केला नाहीस तर तुझ्या कुटुंबियांना गोळीने मारू अशी धमकी देण्यात येत आहे. आणि यामुळेच विद्यार्थ्याने हा आरोप मान्य केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
सीपीओसमोर सोमवारी या आरोपी विद्यार्थ्याने प्रद्युम्नची हत्या मी केली नाही अस वक्तव्य केलं. तो विद्यार्थी त्या दिवशी अगदी शांत दिसत होता. त्याने सांगितले की मी सीपीओ आहे. तू न घाबरता सर्व गोष्टी स्पष्ट सांग. तेव्हा या आरोपीने म्हटले की मी कोणाचीही हत्या केलेली नाही. मला या प्रकरणात हसवलं जातंय.