नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलामध्ये (Indian Coast Guard) सरकारी नोकरीसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन कोस्ट गार्डकडून नाविक पदासाठी Indian Coast Guard Navik Recruitment 2020 सरकारी नोकरीत भरती सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी आवश्यक ती योग्यता आणि आवड असल्यास २ फेब्रुवारीपर्यंत या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.
या भरतीसाठी उमेदवार १०वी आणि १२वी परिक्षा कमीत-कमी ५० टक्क्यांसह पास होणं आवश्यक आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारच्या प्रवर्गातील उमेदवाराला परिक्षा फी जमा करण्याची आवश्कता नाही. या भरतीवेळी लेव्हल-३ पे स्केलनुसार, पगार आणि इतर फायदे दिले जातील.
पद - नाविक (जनरल ड्यूटी)
जागा - २६० (ओपन-११३, ईडब्ल्यूएस-२६, ओबीसी- ७५, एसटी-१३, एससी-३३)
पे स्केल - २१, ७०० रुपये (लेव्हल-३)
वयोमर्यादा - १८ ते २२ वर्ष (१ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ दरम्यान जन्म)
उंची - १५७ सेंटीमीटर
धाव - १.६ किलोमीटर ७ मिनिटं
२० स्क्वाट अप्स
१० पुश अप्स
अर्ज भरण्यापूर्वी उमेदवार, इंडियन कोस्ट गार्डच्या www.joinindiancoastguard.gov.in वेबसाईटवरुन अधिक माहिती घेऊ शकतात. नोकरीसाठी पोस्टिंग संपूर्ण देशभरात होऊ शकते. उमेदवाराची निवड लेखी परिक्षा आणि मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल. याअंतर्गत परिक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात येईल.
निवड करण्यात आलेल्या उमेदवाराचं ट्रेनिंग आयएनएस चिल्का (INS Chilka)येथे होईल. उमेदवाराला अधिक नंबरचा चष्मा असल्यास तोदेखील या भरतीसाठी पात्र असणार नाही.