SBIकडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! बँकिंग सेवा होऊ शकतात बंद, आताच हे काम करा

एसबीआयने यासंदर्भात ट्विटही केले आहे.

Updated: Sep 11, 2021, 06:06 PM IST
SBIकडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! बँकिंग सेवा होऊ शकतात बंद, आताच हे काम करा title=

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. वास्तविक, बँकेने आपल्या खातेधारकांना 30 सप्टेंबरपूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची नोटीस दिली आहे. जर ग्राहकांनी असे केले नाही, तर त्यांना बँकिंग सेवेमध्ये अडचणीला सामोरे जावे लागेल असेही बँकेने म्हटले आहे. एसबीआयने यासंदर्भात ट्विटही केले आहे.

30 सप्टेंबर पर्यंत संधी

एसबीआयने आपल्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की, 'आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की, त्यांचे पॅन आधारशी लिंक करा. जेणेकरून कोणतीही गैरसोय होऊ नये आणि अखंड बँकिंग सेवेचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. यासोबतच बँकेने सांगितले की पॅनला आधारशी जोडणे अनिवार्य आहे. जर पॅन आणि आधार जोडलेले नाहीत, तर पॅन निष्क्रिय होईल आणि पॅन तुम्हाला बँकिंग व्यवहार करण्यासाठी वापरता येणार नाही. पॅनला आधारशी जोडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

गेल्या महिन्यात केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पॅनला आधारशी जोडण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. आधी ही मुदत 31 मार्च होती, पण नंतर ती 30 जून करण्यात आली. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचा पॅन आधारची लिंक करा. हे करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.

पहिला मार्ग

1- प्रथम तुम्ही इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा
2- येथे डाव्या बाजूला तुम्हाला लिंक आधार चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
3- एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला पॅन, आधार आणि तुमचे नाव आधारमध्ये नमूद करावे लागेल.
4- जर तुमच्या आधार कार्डमध्ये तुमच्या जन्माचे फक्त वर्ष असेल, तर  'I have only year of birth in aadhaar card' या बॉक्सवर क्लिक करा.
5- त्यात कॅप्चा कोड प्रविष्ट करा किंवा OTP साठी टिक करा
6- आधार लिंकच्या बटणावर क्लिक करा, तुम्हाला लगेच पॅन आणि आधार लिंक होईल.

दुसरा मार्ग

तुम्ही एसएमएसद्वारे पॅन आणि आधार लिंक करू शकता
- मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये टाइप करा- UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN>
- हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा, बस तुमचा PAN आणि आधार लिंक झाला.