SBIमध्ये नोकरीची संधी; असा करा ऑनलाईन अर्ज

अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा...

Updated: Jan 3, 2020, 04:47 PM IST
SBIमध्ये नोकरीची संधी; असा करा ऑनलाईन अर्ज title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकमध्ये (SBI) लिपीक संवर्गातील कनिष्ठ सहकारी पदासाठी  ८ हजार रिक्त पदांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार स्टेट बँकच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरुन लिंकच्या माध्यमातून SBI Clerck 2020 ऑनलाईन अर्ज करु शकतात. याशिवाय उमेदवार https://ibpsonline.ibps.in/sbijassdec19/ या लिंकवरुन थेट अर्ज करु शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरातील बँकेच्या विविध शाखांमध्ये रिक्त असलेल्या ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट ऍन्ड सेल) रिक्त पदांसाठी SBI Clerk 2020 Notification २ जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आलं आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. 

देशभरात जवळपास ८ हजार पदं उपलब्ध आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवार SBI Clerk 2020 साठी ३ जानेवारी २०२० पासून अर्ज भरण्यास सुरुवात करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० पर्यंत आहे.  UR / OBC / EWS उमेदवारांना २६ जानेवारी २०२० किंवा त्यापूर्वी ऑनलाईन माध्यमातून अर्जाची फी जमा करु शकतात.

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - https://bank.sbi/documents/77530/400725/JA+20+-+Detailed+Ad+%28Eng%29++-...

अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा -

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - ३ जानेवारी २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ जानेवारी २०२०
SBI Clerk प्रीलिम्स परिक्षा - फेब्रुवारी/ मार्च २०२०

वय मर्यादा -

२० ते २८ वर्ष

कसा कराल अर्ज -

उमेदवाराला बँकेची वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/ यावरुन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन फी भरावी लागेल. 

अर्ज करण्यासाठी फी -

UR / OBC / EWS – ७५० रुपये
SC / ST / PWD / XS – फी नाही