SBI Recruitment 2022 : खुशखबर! SBI कडून 5000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, या लिंक वरून करा Apply

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज 

Updated: Sep 7, 2022, 11:44 AM IST
SBI Recruitment 2022 : खुशखबर!  SBI कडून 5000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, या लिंक वरून करा Apply  title=

SBI Clerk Notification 2022 : देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक म्हणून गणल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नं लिपीक (Cleark) कॅटेगरी मध्ये एसोसिएटच्या पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत एकूण 5008 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या जागांसाठी आजपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  (SBI Clerk Notification)

उमेदवार फक्त एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात त्या राज्यातील स्थानिक भाषेबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी त्यासोबतच अंतिम वर्षाचे विद्यार्थीसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकतात. परंतु पदवी ही 30 नोव्हेंबर 2022 रोजी च्या आधी पूर्ण झालेली असायला हवी.

बँकेकडून (Ahamadabad, Bengaluru, Bhopal, Chennai, Maharashtra) अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनऊ, दिल्ली, आणि महाराष्ट्रामधील बँकांसाठी SBI 5008 पदांचा भरणा करण्यात येणार आहे. (Application process) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं वय किमान 20 वर्षे ते  28 वर्षे इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

अशा होणार परीक्षा
SBI Clerk Prelims Exam 2022
SBI Clerk Mains Exam 2022
SBI Clerk Language Test 2022

SC/ST/PwBD/ESM/DESM श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागत नाही. तर सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावं लागणार आहे.

असा भरा फॉर्म- 
या लिंकवर करा Apply - https://bank.sbi/careers या https://www.sbi.co.in/careers 

 या लिंकवर https://bank.sbi/web/careers जा, त्यानंतर तिथं  'RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) (Apply Online from 07.09.2022 TO 27.09.2022) (Advertisement No: CRPD/CR/2022-23/15)'under Current Openings’ वर क्लिक करा. 

आता फॉर्म तुमच्यासमोर उघडेल त्यानंतर योग्य माहिती भरत हा फॉर्म भरा. फॉर्म पूर्ण भरल्यानंतर, तुम्हाला डेटा सबमिट करावा लागेल. फॉर्म भरल्यावर पुन्हा एकदा माहितीची खात्री करून घ्या आणि शुल्क भरा. फी भरून झाल्यावर भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा.