SBI चा कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका; बँकेने केला हा बदल, आजपासून जास्त येणार खर्च

 SBI Interest Rate:एसबीआयकडून (SBI) कर्जदारांच्या EMEमध्ये वाढ होईल. यापूर्वी आरबीआयने (RBI) रेपो दरात  1.40  टक्के वाढ केली आहे. हा बदल तीन वेगवेगळ्या काळात लागू करण्यात आला आहे.

Updated: Sep 15, 2022, 03:47 PM IST
SBI चा कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका; बँकेने केला हा बदल, आजपासून जास्त येणार खर्च  title=

SBI Interest Rate Hike: जर तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) कर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँकेकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. SBI ने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटमध्ये (BPLR) 70 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या बदलानंतर SBI कडून कर्ज घेणाऱ्यांचे EME वाढेल. यापूर्वी आरबीआयने रेपो दरात 1.40 टक्के वाढ केली आहे. हा बदल तीन वेगवेगळ्या काळात लागू करण्यात आला आहे.

BPLR मध्ये RBI ने रेपो रेट 70 बेसिस पॉईंटने वाढवल्यानंतर, सरकारी आणि खासगी बँका कर्जाच्या दरात बदल करत आहेत. त्यामुळे बँकेच्या कर्जाची परतफेड करणे महाग होत आहे. मात्र, बँकांकडून मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरही वाढवले ​​जात आहेत. 70 बेसिस पॉइंट्सच्या वाढीनंतर, SBI च्या BPLR आधारित कर्जाचा व्याजदर 13.45 टक्के झाला आहे.

नवीन दर 15 सप्टेंबरपासून लागू

नवीन दर 15 सप्टेंबरपासून लागू करण्यात आले. बीपीएलआरशी (BPLR) जोडलेल्या कर्जाची परतफेड आता पूर्वीपेक्षा महाग होणार आहे. कारण वाढीपूर्वी बीपीएलआरचा दर 12.75 टक्के होता. यापूर्वी जून महिन्यात हा दर बदलण्यात आला होता. बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेटच्या व्याजदरात बदल करून नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती एसबीआयच्या (SBI) वेबसाइटवर देण्यात आली आहे.

बँकेने बेस रेटमध्येही 70 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यानंतर बेस रेट 8.7 टक्के झाला आहे. मूळ दरावर लागू होणारे नवीन दर 15 सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. मूळ दर हा आधार म्हणून घेतल्यास कर्जदारांचा ईएमआयही महाग होईल.