खरंच पक्षी भुंकायला लागला तर? विश्वास बसत नाही मग हा पाहा व्हिडीओ

हा कुत्रा आहे की Seagull? हा व्हिडीओ तुम्ही पाहा आणि तुम्हीच ठरवा

Updated: Aug 3, 2021, 11:11 PM IST
 खरंच पक्षी भुंकायला लागला तर? विश्वास बसत नाही मग हा पाहा व्हिडीओ

मुंबई: अनेक प्राणी नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. कधी एकमेकांची तर कधी दुसऱ्याची. मात्र एका पक्षाने चक्क कुत्र्याच्या आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वास बसणार नाही पण खरंच एक क्षण हा व्हिडीओ पाहिल्यावर वाटतं की हे कसं शक्य आहे हा प्रश्न पडतो.

अनेक प्राणी किंवा पक्षी आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र एका पक्षानं थेट कुत्र्याची नक्कल करण्याचं धाडस केलं आहे. कुत्र्याच्या आवाजाची नक्कल करणं काही सोपी गोष्ट नाही. मात्र या पक्षाने काढलेला हुबेहुब आवाज पाहून युझर्सही थक्क झाले आहेत. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. Seagull या पक्षाने कुत्र्याच्या आवाजाची हुबेहुब नक्कल केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच युझर्सही हैराण झाले आहे. अनेकांना हे कसं शक्य आहे असा प्रश्न पडला आहे. सोशल मीडियाच्या सर्व फ्लॅटफॉर्मवर सध्या या पक्षाची तुफान चर्चा होत आहे. 

सीगल बद्दल असं म्हटलं जातं की तो एक बुद्धिमान आणि जिज्ञासू पक्षी आहे. हा मुख्यतः समुद्र किनाऱ्यावर जास्त दिसतो. सीगल त्यांच्या चोचीने हल्ला करतात. जिथे जिथे या प्रजातीचा पक्षी दिसतो तिथे त्याला टाळण्यासाठी लोक आपल्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवतात.