ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन

 दिल्लीतील अपोलो रुग्णालयात रात्री साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Updated: Aug 23, 2018, 10:23 AM IST

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात रात्री साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९५ व्या वर्षांचे होते. राज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवली. काही काळापासून त्यांना त्रास जाणवत होता. आज दुपारी १ वाजता लोधी रोड येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत 

भारत सरकारच्या प्रेस सुचना अधिकारी पदावर ते अनेक वर्षे होते. यू.एन.आय, पी.आय.बी, द स्टेट्समॅन, इंडियन एक्सप्रेससोबत त्यांनी अनेक वर्षे काम केलं. २३ नोव्हेंबर २०१५ ला त्यांच्या पत्रकारितेतील योगदानासाठी रामनाथ गोयंता स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.