20 महिन्याची चिमुकली जग सोडून गेली, पण ५ लोकांना जीवनदान देऊन गेली

तिच्या नशिबात जीवन फक्त २० महिने होतं, एका अपघातात तिचा जीव गेला, पण २० महिन्याची धनिष्ठा ही सर्वात 

जयवंत पाटील | Updated: Jan 15, 2021, 05:19 PM IST

नवी दिल्ली : तिच्या नशिबात जीवन फक्त २० महिने होतं, एका अपघातात तिचा जीव गेला, पण २० महिन्याची धनिष्ठा ही सर्वात लहान वयाची ऑर्गन डोनर ठरली. हॉस्पिटलमध्ये तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं, यानंतर तिच्या आईवडिलांनी ऑर्गन डोनेट करण्याचा निर्णय घेतला. धनिष्ठाचं हृदय, किडनी, लिव्हर आणि दोन्ही कॉर्नियांमुळे पाच मुलांना जीवनदान मिळालं.

तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं पण...

दिल्लीतील रोहिणीत राहणारी धनिष्ठा ८ जानेवारी रोजी खेळत होती, खेळताना ती फर्स्ट फ्लोअरच्या बाल्कनीतून खाली पडली. धनिष्ठाला खूप लागलं होतं. तिचे आईवडील तिला सर गंगाराम हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरांनी इलाज सुरु केला, पण ११ जानेवारी रोजी तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं

 दुसऱ्यांच्या चिमुकल्यांना पाहून निर्णय

धनिष्ठाच्या बाबा आशीष कुमार यांनी सांगितलं, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, धनिष्ठा ब्रेनडेड झाली आहे, ती परत ठिक होण्याची शक्यता नाहीय. जेव्हा आमची मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल होती, तेव्हा आम्हाला असे पालक मिळाले, ज्यांना त्यांच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी अवयव (ऑर्गन) हवे होते.

आमची मुलगी दुसऱ्या चिमुकल्यांच्या शरीरात जिवंत आहे...

आशीष म्हणतात, 'आमची धनिष्ठा ब्रेनडेड झाली,  यावरुन मी डॉक्टरांना विचारलं, आम्ही धनिष्ठाचं अवयव दान करु शकतो का ? यावर त्यांनी उत्तर दिलं, हो तुम्ही धनिष्ठाचं अवयवदान करु शकतात.  मी आणि माझ्या पत्नीने ठरवलं की, आपण आपल्या ब्रेनडेड मुलीच्या अवयवांचं दान करुन अनेकांच्या लहान मुलांचे जीव वाचवू शकतो.

हार्ट, किडनी, लिवर ट्रांसप्लांट

सर गंगाराम हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. डीएस राणा म्हणतात, ब्रेनशिवाय धनिष्ठाचे सर्व शरीराचे भाग व्यवस्थित काम करत होते. आईवडिलांच्या परवानगीनंतर धनिष्ठाचं हार्ट, किडनी, लिव्हर आणि दोन्ही  कॉर्निया हॉस्पिटलमध्येच प्रिझर्व करण्यात आले होते. तिची किडनी एका वयस्काला आणि हार्ट आणि लिव्हर दोन वेगवेगळ्या मुलांना देण्यात आले आहेत. कॉर्नियाला अजून सुरक्षित ठेवण्यात आले आहेत, जे आणखी २ लोकांना दिले जाणार आहेत. अशा पद्धतीने धनिष्ठाने पाच लोकांची जीव वाचवला आहे.

अवयव न मिळत असल्याने दरवर्षी ५ लाख लोकांचा मृत्यू

डॉ. मीणा यांनी म्हटलं आहे की,  या परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यातून दुसऱ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी. देशात दरवर्षी १० लाख लोकांना विविध अवयवयांची गरज असते, पण फक्त २६ टक्के अवयव दान केलं जातं. यात १० लाखांपैकी पैकी ५ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

२० हजार लोकांनी लिव्हरची गरज

गंगाराम हॉस्पिटलचे को-चेअरमन आणि चीफ लिवर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.मनीष मेहता यांनी सांगितलं, देशात अवयवदान आणि ट्रान्सप्लांटचा दर खूप कमी आहे. केवळ २० ते ३० टक्के अवयव  उपलब्ध असतात. जास्त प्रमाणात पाहिलं तर जवळजवळ २० हजार रुग्ण ट्रान्सप्लांटची वाट पाहू शकतात.

मेहता म्हणतात, दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांच्यात अवयवदान करण्याच्या बाबतीत मोठं अंतर आहे, जर लोकसंख्येचं कॅलक्युलेशन केलं तर, जर दक्षिण भारतात एक अवयवदान होत असेल, तर उत्तर भारतात याची संख्या ०.०१ एवढीच आहे.