शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्याने या हॉटेलवर प्रचंड बंदोबस्त

Maharashtra Political Crisis​ : सत्तासंघर्षातली महत्त्वाची तीन केंद्र ठरतायत ती गुवाहाटी, गोवा आणि मुंबई. शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्यानं गोव्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

Updated: Jun 29, 2022, 02:08 PM IST
शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्याने या हॉटेलवर प्रचंड बंदोबस्त  title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षातली महत्त्वाची तीन केंद्र ठरतायत ती गुवाहाटी, गोवा आणि मुंबई. शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्यानं गोव्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलाय. हे सगळे बंडखोर आमदार डोनापावलामधल्या हॉटेल ताजमध्ये राहणार आहेत. ताज हॉटेलजवळण जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेटिंग करण्यात आलंय. ताज हॉटेलमध्ये 71 रुम्स बुक करण्यात आल्यायत. बंडखोर आमदार स्पेशल विमानानं संध्याकाळपर्यंत गोव्यात पोहोचतील. (Shiv Sena rebel MLAs will stay at Taj Convention Hotel in Goa)

गुवाहाटीतून आमदार तीनच्या सुमाराला निघणार आहेत. आमदारांसाठी स्पेशल विमान एअरपोर्टवर सज्ज असून संध्याकाळी सहापर्यंत बंडखोर आमदार गोव्यात दाखल होणार आहेत.

एकनाथ शिंदे गटाचा 22 जूनपासून गुवाहाटीत मुक्काम होता. तिथून आज आमदार बाहेर पडले. एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांनी कामाख्या मंदिरात दर्शन घेतलं. तिथून आमदार गोव्याला रवाना होणार आहेत. गोव्यात ताज हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम असणार आहे. तिथे आमदारांसाठी 71 रुम्स बुक करण्यात आल्यायत. तर तिथून उद्या सकाळी निघून आमदार मुंबईत पोहोचणार आहेत आणि विधानभवनात होणाऱ्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. 

दरम्यान,  मुंबईत ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये 123 रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. बंडखोर आमदारांना याच हॉटेलमध्ये घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढ्या रुम का बुक करण्यात आल्या आहेत, याचीच चर्चा सुरु आहे.