Dog Bite Child Video Viral: उत्तर प्रदेशातील नोएडा एक्स्टेंशनमधील एका सोसायटीत कुत्र्याने लहानग्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ग्रेटर नोएडा वेस्टमधली ला रेसिडेन्सी सोसायटीत घडला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लिफ्टमध्ये एका पाळीव कुत्र्याने शाळकरी मुलावर हल्ला केल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर लहानगा घाबरल्याचं दिसत आहे. घटनेच्या दिवशी मुलागा आईसोबत शाळेत जात असताना हा प्रकार घडला. नेमका तेव्हाच सोसायटीतील एक व्यक्ती कुत्र्याला घेऊन लिफ्टमध्ये आला. मुलगा आणि आई एका बाजूला उभी होती. तितक्यात कुत्र्याने शाळेकरी मुलावर हल्ला (Dog Attack) केला. यात मुलगा जखमी झाला असून मुलाला चार इंजेक्शन देण्यात आले आहेत.
या हल्ल्यानंतर जखमी मुलाच्या आईने संताप व्यक्त केला आहे. घटनेमुळे व्यथित झालेल्या आईने सांगितले की, "कुत्र्यांना लहान मुलांच्या जवळच काय तर सोसायटीत प्रवेश देऊ नका." दुसरीकडे, कुत्र्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना पाहता नोएडा प्राधिकरणाने पाळीव प्राण्यांबाबत धोरण तयार केले आहे. प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पाळीव प्राण्यांच्या मालकांना पुढील वर्षी 31 जानेवारीपर्यंत त्यांच्या कुत्र्यांची किंवा मांजरीची नोंदणी करावी लागेल किंवा दंडाला सामोरे जावे लागेल.
This morning at La Residentia Greater Noida West! When will dog parents learn to use a muzzle? #dogbite @noidapolice @Uppolice pic.twitter.com/flpYas5qMi
— UP-70 (@bakaitpandey) November 16, 2022
- नोएडा प्राधिकरणाच्या नवीन धोरणानुसार 31 जानेवारी 2023 पर्यंत पाळीव कुत्रे किंवा मांजरींची नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी न केल्यास दंड आकारण्यात येईल.
- कोणतीही अनुचित घटना घडल्यास, पाळीव प्राण्याच्या मालकाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया (AWBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नोएडा प्राधिकरणाच्या 207 व्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- 1 मार्च 2023 पासून जखमी व्यक्तीवर पाळीव कुत्र्याच्या मालकाकडून 10,000 रुपये दंडासह उपचार केले जातील.
- पाळीव कुत्र्यांचे निर्बीजीकरण किंवा रेबीज प्रतिबंधक लसीकरण देखील अनिवार्य करण्यात आले आहे, तर उल्लंघन केल्यास दरमहा 2000 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.