पश्चिम बंगाल : कोणत्याही गोष्टीची नशा ही वाईटच मानली जाते. व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीची नशा लागली तर त्याचं आयुष्यही उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. मुख्य म्हणजे आजकाल नशा करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला कल्पना आहे का की, नशा करण्यासाठी चक्क condoms चा वापर केला जातोय.
अशा घटना घडतायत त्या पश्चिम बंगालमध्ये. तुम्हाला हे ऐकून नक्कीच विचित्र वाटेल, मात्र हे खरंय. पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमधील काही मुलांना फ्लेवर्ड कंडोमची वाफ घेऊ नशा करण्याचं व्यसन लागलंय. मुख्य म्हणजे यामुळे तिथे कंडोमचा तुडवडा निर्माण झाल्याने कंडोम मिळणं कठीण झालंय.
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर मधील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, काही मुलांना अशा प्रकारची नशा करण्याचं व्यसन लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सिटी सेंटर, बिधाननगर, बेनाचिती तसंच मुचिपारामध्ये फ्लेवर कंडोम्सची मोठ्या प्रमाणात विक्री होतेय.
एका जर्नलने छापून आलेल्या अहवालानुसार, फ्लेवर्स कंडोम्समध्ये सुगंधी संयुगे असतात. ही संयुगे म्हणजेच अॅरोमेटिक तुटून अल्कोहोल तयार होतात. यामुळे याचं व्यसन लागण्याची दाट शक्यता असते. अशी संयुगे इतर बऱ्याच गोष्टींमध्ये आढळून येतात.
मेडिसन जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार, जर गरम पाण्यामध्ये खूप वेळ कंडोम ठेवला तर त्यामधील संयुगं तुटतात. यामुळे ती दारूसारखी बनतात, आणि त्याचा व्यसनासारखा वापर केला जातो.
दरम्यान पश्चिम बंगालमधील मेडिकल दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, काही मुलं 3 ते 4 कंडोमची पाकिटं घेऊन जात होती. मात्र आता दुकानातून कंडोमच संपलाय. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात कंडोम्सची खरेदी केली जातेय.