मुंबई : सोशल मीडियाच्या या युगात आपल्यासमोर वेगळेगळ्या गोष्टी येत असतात. आपण फक्त सोशल मीडिया ओपन केला की, तिथे आपल्याला इतके वेगवेगळे कन्टेन्ट पाहायला मिळतील की, ज्यांना पाहताना आपला संपूर्ण दिवस निघून जाईल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो इतका धक्कादायक आहे, जो पाहताच तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. या व्हिडीओ लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) ने भरलेला ट्रक दरीत पडताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
ही घटना पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) असल्याचे सांगितले जात आहे. जिथे एक ट्रक चालक अरुंद रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच दरम्यान ट्रकचा तोल जातो आणि द्रवरूप पेट्रोलियम गॅसने भरलेला ट्रक दरीत कोसळला. ही घटना खरोखरंच अंगावर काटा आणणारी आहे.
रिपोर्टनुसार, घटनास्थळी कोणताही स्फोट झाला नाही. Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. परंतु या ट्रक चालकाचे काय झाले, हे समजू शकलेलं नाही.
व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हे दृश्य खरोखरच थक्क करणारे आहे, जे पाहिल्यानंतर कोणीही थरथर कापेल.' आणखी एका युजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, 'एवढ्या अरुंद रस्त्यावर एवढं जड वाहन वाहून जाऊ नये.' यामुळेच अशा घटना घडतात.