Tandoor Rotis News : खवैय्यांची सातत्यानं पसंती असणारा आणि अनेकांच्याच पानात सर्रास दिसणारा एक पदार्थ म्हणजे तंदूर रोटी (Tandoor Toti recipe). हॉटेलमध्ये किंवा कुठे फिरायला गेलं असतासुद्धा (Butter Chicken) बटर चिकन असो किंवा मग (Paneer butter Masala) पनीर बटर मसाला असो त्यासोबत तंदूर रोटी दिसतेच दिसते. पण, आता मात्र चवीनं खाणाऱ्यांची अडचण वाढणार आहे. कारण, त्यांना आता या तंदूर रोटीसाठी पर्याय शोधावा लागणार आहे. कारण, या रोटीवर बंदी आणण्यात आली आहे. ज्यामुळं खवैय्यांसोबत हॉटेल मालकांनाही धक्का बसला आहे. हा धक्का इतका मोठा आहे, की काहींनी तर ही तंदूर रोटी कालबाह्य होते की काय, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
देशातील जबलपूर (Jabalpur) येथे प्रशासनानं वाढत्या प्रदुषणाचा हवाला देत हॉटेल आणि रेस्तराँ मालकांवर तंदूरचा वापर टाळण्याचा निर्णय देण्यात आला आहे. सदर अंमलबजावणीसाठी प्रशासनाच्या अन्न सुरक्षा विभागाकडून शहरातील जवळपास 50 हॉटेल्सना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. शिवाय लाकूड आणि कोळशाचा (Wooden Tandoor/ coal tandoor) वापर होणाऱ्या तंदूरचा वापर टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. त्यामुळं आता ज्या हॉटेल्सना तंदूर रोटी विकायची आहे, त्यांनी इलेक्ट्रीक किंवा LPG चा वापर करावा असाही पर्याय सुचवला.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तंदूर रोटी तयार करताना वापरला जाणारा कोळसा आणि लाकूड जाळला जात असल्यामुळं त्यापासून धूर पसरतो. तंदूर रोटीमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणही जास्त असतं. आरोग्याच्या दृष्टीनं ही बाब अतिशय घातक असल्याचंही नाकारता येत नाही. ज्यामुळं येत्या दिवसांमध्ये जीभेचे चोचले पुरवायचे असल्यास तंदूर रोटीऐवजी इलेक्ट्रीक रोटीचा वापर करणं अपेक्षित असेल.
अन्न सुरक्षा विभगाकडून जारी करण्यात आलेल्या या नव्या नियमाचं पालन न केल्यास रेस्तराँ आणि हॉटेल मालकांवर 5 लाखांचा दंड भरण्याची वेळ येईल. त्यामुळं यापुढे तंदूर रोटी विकताना त्यांना दोनदा विचार करावा लागणार आहे.
मुळात तंदूर रोटी, किंवा तंदूरमध्ये तयार करण्यात येणारे पदार्थ यासाठीच मागवले जातात की त्यामध्ये तंदूरची चव असते. धुमसणारा धूर पदार्थाला एक वेगळीच चव देतो, याच चवीसाठी अनेक खवैय्ये चांगलेच पैसेही मोजतात. पण, आता तंदूर रोटीसाठीचा तंदूरच नसेल तर या रोटीला काहीच चव उरणार नाही अशी व्यथा रेस्तराँ मालकांकडून मांडली जात आहे.