Viral Video : विजेच्या (electricity) वाढत्या वापरामुळे त्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये अपुऱ्या कोळश्यामुळे (Coal) वीज पुरवठा खंडित होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पु्न्हा कोळशाची मागणी वाढली आहे. वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा खाणीतून कोळसा काढण्याचे कामही जोरात सुरू आहे. अशातच छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील कोळसा खाणीतून (Coal Mine) कोळसा काढण्यापूर्वी ब्लास्टिंगचा व्हिडिओ समोर आला आहे. या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात धुळीचे ढग जमा झाल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कुसमुंडा कोळसा खाणीत (kusmunda mines) झालेल्या या स्फोटाचा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचबरोबर या भयंकर स्फोटामुळे (Blasting) आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार,या स्फोटासाठी मोठ्या प्रमाणात गनपावडरचा वापर करण्यात आला होता. या स्फोटानंतर 40 फुटांपर्यंत धूळ उडाल्याचे दिसत आहे. खाणीमध्ये एकापाठोपाठ अनेक स्फोट करण्यात आले. तसेच व्हिडिओमध्ये सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.
#Chhattisgarh के #KusmundaMines में ब्लास्टिंग का #ViralVideo #mining pic.twitter.com/TGtA4lBOxa
— Narendra Singh (@NarendraNeer007) November 18, 2022
या स्फोटामुळे खाणीतील कोळश्याचे तुकडे लोकांचे घरांवर पडत आहेत. या स्फोटांमुळे जवळपासच्या सर्वच घरांना तडे गेले आहेत. या स्फोटांमुळे नागरिकांमध्येही रोष निर्माण झालाय. अनेकांच्या घरांची यामुळे दुर्दशा झालीय. या स्फोटांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालय. ग्रामस्थांनी एसईसीएलच्या अधिकाऱ्यांकडेही याबाबत तक्रार करण्यात आलीय. मात्र याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गरजेपेक्षा जास्त प्रमाणात दारुगोळा वापरून हे स्फोट घडवण्यात येत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लांब पर्यंत कोळसा आणि धूळ उडून येत आहे. जिल्हा प्रशासनानेही याबाबत एएससीएलला याबाबत इशारा दिला होता. मात्र वेळेत काम संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोट घडवून आणले जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.