कौतुकास्पद ! वयाच्या ६० व्या वर्षी महिलेनं घेतली पदवी

 शिकण्याला वय नसतं असं म्हटलं जात हे सिद्ध करून दाखवलंय 60 वर्षांच्या एका महिलेनं

Updated: Feb 6, 2021, 05:36 PM IST
कौतुकास्पद ! वयाच्या ६० व्या वर्षी महिलेनं घेतली पदवी title=

मेघा कुचिक, मुंबई : शिकण्याला वय नसतं असं म्हटलं जात हे सिद्ध करून दाखवलंय 60 वर्षांच्या एका महिलेनं...स्नेहल शिंदे यांनी वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी नाईट स्कूलमधून दहावीचं शिक्षण पूर्ण केलं तर 2020 मध्ये त्यांनी BAची पदवी घेतली आहे.

शिकण्याला वय नसतं असं म्हटलं जातं पण ते 60 वर्षांच्या स्नेहल शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. मराठी वाड्मय या विषयात त्यांनी 90% मिळवत नुकतीच BAची पदवी मिळवली आहे. शिकण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर काहीही कठीण नाही.

वरळीतील आगरकर नाईट स्कूलमधून स्नेहल शिंदे यांनी दहावीची परीक्षा56% पास केली. तर जुहतील एस. एन. डी. टीमधून त्यांनी 90% मिळवत ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आता MA करण्याचाही त्या विचार करत आहेत.

दहावीचा अभ्यास करताना त्यांना spondylosis चाही त्रास झाला पण त्यांनी काही जिद्द सोडली नाही. शाळेत आणि दहावीत त्या सर्वाधिक वयाच्या होत्या. मात्र मनात याबाबत काहीही न आणता त्यांनी केवळ शिकणावर लक्ष केंद्रित केलं आणि ते आत्मसादही केलं. यामध्ये त्यांना त्यांच्या मुलांचीही चांगला पाठींबा मिळाला.

शिक्षणाला वय नसते असं म्हटलं जातं आणि हे स्नेहल शिंदे यांनी खरं करून दाखवलं आहे.  त्यांच्यासारख्या समाजात अनेक स्त्रीया आहेत की ज्या केवळ परिस्थिमुळे शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत. मात्र स्नेहल शिंदे यांनी कसलाही बाऊ न करता परिस्थितीवर मात करत वयाच्या 60 व्या वर्षी का होईना पदवी प्राप्त केली आहे ही नक्कीच कौतुकास्पद आहे.