ऐकावं ते नवलच! हर्निया म्हणून दवाखान्यात गेला पण ऑपरेशननंतर पोटातून निघाला मोठा ग्लास!

कात्री, नाणं किंवा खिळा अशा गोष्टी ऑपरेशन करून काढल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र पोटामधून ग्लास काढल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

Updated: Aug 6, 2022, 07:09 PM IST
ऐकावं ते नवलच! हर्निया म्हणून दवाखान्यात गेला पण ऑपरेशननंतर पोटातून निघाला मोठा ग्लास! title=

लखनऊ : गेल्या तीन चार दिवसांपासून पोटात दुखत असल्यामुळे दवाखान्यात गेलेल्या रूग्णाचे ऑपरेशन केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. या रूग्णाच्या पोटामधून चक्क स्टीलचा ग्लास निघाला आहे. कात्री, नाणं किंवा खिळा अशा गोष्टी ऑपरेशन करून काढल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र पोटामधून ग्लास निघाला हे ऐकल्यावर विश्वासच बसत नाही. संबंधित रूग्णाचं नाव समरनाथ असं आहे.

नक्की काय आहे प्रकरण- 
समरनाथ यांच्या गेल्या तीन-चार दिवसांपासून पोटात दुखायला लागलं. त्यानंतर ते अनेक डॉक्टरांकडे गेले मात्र काही फरक पडला नाही. ते जेवण करत नव्हते आणि त्यांना टॉयलेटलाही होत नव्हतं, अखेर घरच्यांनी हर्निया असल्याचं समजून रूग्णालयात नेलं. ही घटना उत्तर प्रदेशमधील महराजगंज जिल्ह्यातील गोठवा भटौलीतील आहे. 

​Steel Glass In Stomach

डॉक्टरांनी आधी समरनाथ यांची अल्ट्रासाऊंड चाचणी केली. मात्र त्यातून काहीही समजलं नाही. त्यानंतर एक्स-रे काढला त्यामध्ये समरनाथ यांच्या पोटात काचेसारखे काहीतरी असल्यासारखं दिसले. त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन केल्यावर डॉक्टरही शॉक झाले. 

समरनाथ यांच्या पोटामधून स्टीलचा 4 इंच लांब आणि अडीच इंच रूंदीचा ग्लास बाहेर काढला. ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं ते म्हणाले की, मी याआधी असं एक ऑपरेशन केलं आहे. तेव्हा मी पोटातून बाटली काढली होती. मात्र, समरनाथ यांच्या पोटामध्ये इतका मोठा ग्लास गेला कसा याबाबत ठोस अशी मीहिती अद्याप समजली नाही.