Share Business | टाटा ग्रुपच्या या शेअरने केलं मालामाल, 1 लाखावर 4 कोटींचा तुफान परतावा

Tata Elxsi Share Business News: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक जोखिम मानली जाते. परंतू टाटा ग्रुपच्या कंपनीच्या या शेअरने गेल्या 21 वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

Updated: Jun 8, 2022, 08:38 AM IST
Share Business | टाटा ग्रुपच्या या शेअरने केलं मालामाल, 1 लाखावर 4 कोटींचा तुफान परतावा title=

नवी दिल्ली : जगातील प्रत्येकालाच असं वाटतं की, कमीत कमी वेळात श्रीमंत व्हावं. त्यासाठी लोकं स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावतात. अनेक लोकं स्टॉक मार्केटमधून चांगले पैसे मिळवतात. परंतू अनेकांना ते जमत नाही. उलट त्यांची कष्टाची कमाई वाया जाते. टाटा ग्रुपच्या अशाच एका कंपनीने गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे.

रिपोर्टनुसार गुंतवणूकदारांना मालामाल केलेल्या टाटा ग्रुपच्या या शेअरचं नाव टाटा एलेक्सी आहे. गेल्या काही वर्षातील ट्रेंड पाहिला तर कंपनीचे शेअर्सने बक्कळ परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल 50 हजार टक्क्यांपर्यंत नफा मिळवून दिला आहे. 

मागील गेल्या काही वर्षात टाटा एलेक्सीचा शेअर 17.55 रुपयांचा होता तर जून 2022 मध्ये हा शेअर 8600 रुपयांच्या पुढे गेला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2001 मध्ये कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते. तर त्यांना आज 4 कोटी रुपये मिळाले असते. 

2016 मध्ये टाटा एलेक्सीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 11 लाख रुपये झाले असते.