अंबानींमागोमाग टाटा समूहाची सूत्र पुढच्या पिढीच्या हाती; पाहा कोण आहे ते तिघं

जागतिक उद्योग जगतामध्ये दर दिवशी नवे आणि तितकेच मोठे बदल होत असताना TATA समुहाचा मोठा निर्णय. 'या' तिघांकडे असेल मोठी जबाबदारी 

Updated: Nov 3, 2022, 09:30 AM IST
अंबानींमागोमाग टाटा समूहाची सूत्र पुढच्या पिढीच्या हाती; पाहा कोण आहे ते तिघं  title=
Tata Group to handover business command to next generation know these names

Business News : जग अतिशय वेगानं पुढे जात आहे. (Science and Technology) विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर अनेक गोष्टी क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहेत. (Business) उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रही याला अपवाद नाही. (World Economy) जागतिक अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान देणाऱ्या या क्षेत्रातच आता एक मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कामाची सूत्र आणि (Reliance Group of industries) रिलायन्स उद्योग समुहाची जबाबदारी त्यांच्या पुढच्या पिढीकडे सोपवलेली असतानाच आता टाटा उद्योग समुहाकडूनही (TATA Group) याच कृतीची पुनरावृत्ती करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. 

नोएल टाटा (TATA) यांची मुलं लिया, नोविल आणि माया यांना टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टमध्ये नियुक्त करण्यात आलं आहे. हा निर्णय म्हणजे टाटा समुहाकडून पुढच्या पिढीच्या हाती सूत्र सोपवण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. गोपनीयतेच्या अटीवर ही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली. रतन टाटा यांच्या निरीक्षणाखाली या तिघांनाही एका विस्तीर्ण क्षेत्रात आपल्या कामाची सुरुवात करण्यास होईल, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे. 

वाचा : Proof of Life Certificate: निवृत्तधारकांना आता बँकेत मारावी लागणार नाही चक्कर, अशा प्रकारे ऑनलाइन सादर करा लाईफ सर्टिफिकेट्स

 

नव्या जोमाच्या या तीन सदस्यांच्या येण्यानं आता टाटा मेडिकल सेंटरच्या ट्रस्टींची संख्या दुप्पट झाली आहे. यामध्ये रतन टाटा, विजय सिंह आणि मेहली मिस्त्री यांची नावं आधीपासूनच होती. त्यात आता या तिघांची नावं जोडली गेली आहेत. 

हा निर्णय इतका महत्त्वाचा का? 

2011 मध्ये टाटा मेडिकल सेंटरची सुरुवात करण्यात आली होती. कुटुंबाच्या मते लिया, माया आणि नोविल या तिघांनीही कनिष्ठ स्तरापासून सुरुवात करतच पुढे जावं असंच कुटुंबीयांना वाटत असल्यामुळं त्यांना हे काम सोपवण्यात आलं आहे. 

सध्या ते काय करतात? 

माया, सध्या टाटा डिजिटल (Tata Digital) क्षेत्रात कार्यरत आहे. हा टाटा समुहाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो बऱ्याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम करतो. लिया ही नोएल टाटा यांची सर्वात मोठी मुलगी. सध्या ती इंडियन हॉटेल्स कंपनीच्या विकास आणि विस्तारात हातभार लावत आहे. तर, नोविल ट्रेंट लिमिटेडसाठी काम करतो. सध्या या कंपनीची धुरा त्याचे वडील नोएल टाटा यांच्याकडे आहे. ट्रेंट Westside आणि Croma या रिटेल स्टोअरचं संचालन करते.