ज्याने 'मास्क विरोधी चळवळ' सुरू केली, त्यालाच कोरोनाने गाठलं आणि गमावला जीव

मास्कला विरोध करत एक चळवळ सुरु केली, त्याला नाव दिलं होतं स्वातंत्र्य रॅली

Updated: Aug 31, 2021, 07:58 PM IST
ज्याने 'मास्क विरोधी चळवळ' सुरू केली, त्यालाच कोरोनाने गाठलं आणि गमावला जीव title=

मुंबई : जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. करोडो लोकं या विषाणमुळे बाधित झाले तर आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत आहे. त्यामुळे सावधगिरीचा इशारा दिला जात आहे. पण अजूनही अनेक जण असे आहेत जे कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीएत. 

नुकताच कोरोना संसर्गामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या वक्तीने मास्कविरोधात चळवळ सुरु केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना अमेरिकेतल्या टेक्सास इथली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मरण पावलेल्या या व्यक्तीचे नाव कालेब वालेस आहे.

कोरोना विषाणूने जेव्हा जगभरात थैमान घातलं होतं, तेव्हा अमेरिकेत राहणाऱ्या कालेब वालेस यांनी मास्कविरोधी चळवळ सुरु केली. कालेबने याबद्दल सांगितले की लोकांना मास्क घालण्यास भाग पाडले जात आहे जे लोकांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. कालेब यांनी या चळवळीचं नेतृत्वही केलं. अमेरिकेच्या सेंट्रल टेक्सासमध्ये अनेक गटांनी अशा प्रकारचं आंदोलन केलं होत, यात कालेब यांनी पुढाकार घेतला होता. 

कोरोना विषाणू साथीच्या काळात मास्क घालणं आणि सरकारने लादलेल्या इतर अनेक निर्बंधांना कालेब वालेसने तीव्र विरोध केला. त्यांनी एक संघटना स्थापन केली होती आणि त्याअंतर्गत गेल्या वर्षी जुलैमध्ये अमेरिकेच्या सेंट्रल टेक्सासमध्ये मास्कच्या विरोधात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्याने त्याला 'स्वातंत्र्य रॅली' असे नाव दिलं. ज्याचे नेतृत्व खुद्द कालेबने केलं होतं.

पण नुकतंच कालेब वालेस यांना कोरोनाने गाठलं. त्यांची तब्येत ढासळली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यामुळे कोरोना सारख्या महामारीला हलक्यात घेऊन नका, आपली आणि आपल्या कुटुंबाची तसंच इतरांच्या जीवाची काळजी घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा,  सतत हात स्वच्छ करा आणि ताप, सर्दी असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.