मुंबई: जेव्हा देशातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी उद्योजकांच्या नावावर नजर टाकली जाते तेव्हा, अंबानी बंधूंचे नाव सर्वात आघाडीवर असते. हे अंबानी बंधू म्हणजे जगप्रसिद्ध उद्योगपती धिरूभाई अंबानी यांचे पुत्र. या बंधूंपैकी एक असलेले अनिल अंबानी यांनी नुकताच आपला ५९वा वाढदिवस साजरा केला. अनिल अंबानी सध्या चार कंपन्यांचे मालक आहेत. ते आपल्या व्यावसायीक जिवनात जसे यशस्वी राहिले आहेत तसेच, वैवाहिक जिवनातही ते यशस्वी राहिले आहेत. अनिल अंबानी यांच्या वैवाहिक जिवनाबाबत बोलायचे तर, ती एक लव्हस्टोरी आहे. ही लव्हस्टोरी फुलण्यात भूकंपाचा मोठा वाटा राहिला आहे. जाणून घ्या अनिल अंबानी यांच्या लव्हस्टोरीत भूकंपाचा काय संबंध..?
अनिल अंबानी यांची लवस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा काहीच कमी नाही. अनिल यांचा विवाह बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीम हिच्यासोबत झाला. अनिल आणि टीनाला २ मुले आहेत. एक अनमोल आणि दुसरा अंशुल. १९८६मध्ये अनिल आणि टीना यांची पहिली भेट झाली. ही भेट टीनाच्या भाच्यामुळे झाली.
टीना जेव्हा अनिल यांना भेटण्यासाठी पहिल्यांदा गेली होती तेव्हा, ती साध्या ड्रेसमध्येच होती. अर्थात पहिल्याच भेटीत अनिल आणि टीना यांच्या मनात एकमेकांबद्धल तारा छेडल्या गेल्या. विशेष असे की, या तारा जुळल्या जात असताना टीनाला रिलायन्स ग्रुपबाबत काहीच माहिती नव्हती. दरम्यान, पहिल्याच भेटीत झालेल्या संवादात अनिल अंबानी टीनाला फार आवडले. पण, बहुतांश स्त्रियांप्रमाणे टीनानेही अनिल यांना तसे मुळीच दाखवले नाही. दरम्यान, त्यानंतर त्यांचे भेटणे फार घडले नाही. अनिल अंबानी यांनी अनेकदा टीनाला भेटण्याचा प्रयत्न केला. पण, शुटींगमध्ये व्यग्र असलेल्या टीनाच्या तारखा जुळत नसल्यामुळे ही भेट वारंवार टळत होती. पण, अखेर एक दिवस दोघे भेटलेच.
दरम्यान, अंबानी परिवार टीनासोबत अनिलने लग्न करावे याच्या विरोधात होता. कारण, या परिवाराला टीनाचे अभिनेत्री असणे पसंद नव्हते. दरम्यान, दोघांमध्ये ब्रेक अपही झाला. पण, या लवस्टोरीत यू टर्न तर तेव्हा आला जेव्हा अमेरिकेत भूकंप आला. ते साल होते १९८९. त्या काळात टीना लॉस एंजेलिसमध्ये होती. अनिल अंबानी यांनी टीनाचा नंबर शोधला आणि फोन करून तिची ख्याली खुशाली विचारली. टीनाचे उत्तर ऐकताच अनिलनी फोन कट केला. त्यानंतर टीनाकडूनही रहावले नाही. दोघांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहू लागले. अखेर दोघांचा एकमेकांवरचा जीव पाहून अंबानी फॅमेली टीना-अनिलच्या लग्नाला राजी झाले. अखेर १९९१ मध्ये अनिल-टीना यांच्या लग्नाचा बार उडाला.