Pitbull कुत्र्याच्या हल्यात 3 जण जखमी, पाहा व्हिडिओ

कुत्र्यांच्या हल्यात नवी दिल्लीतील उत्तम नगरमधील3 व्यक्ती जखमी झाले आहे. पिट बूल कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. 28 मार्च रोजी या पिट बूल कुत्र्याने हल्ला केला असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्यात कुत्र्याने एका लहान मुलाला बराच काळ धरून ठेवलं. 

Dakshata Thasale Updated: Apr 2, 2018, 01:18 PM IST
Pitbull कुत्र्याच्या हल्यात 3 जण जखमी, पाहा व्हिडिओ  title=

मुंबई : कुत्र्यांच्या हल्यात नवी दिल्लीतील उत्तम नगरमधील3 व्यक्ती जखमी झाले आहे. पिट बूल कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. 28 मार्च रोजी या पिट बूल कुत्र्याने हल्ला केला असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्यात कुत्र्याने एका लहान मुलाला बराच काळ धरून ठेवलं. 

या व्हिडिओत आपण हा सर्व प्रकार पाहिला आहे. पिट बूलने लहान मुलाला ओलीस धरल्यानंतर स्थानिकांनी  कुत्र्याला बेदम मार दिला मात्र कुत्रा काही केल्या त्या मुलाला सोडत नव्हता. त्या मुलाला सोडायला गेलेल्या बाईला कुत्र्याने नंतर चावा घेतला आहे, 

या व्हिडिओ बघून तुम्हाला अंदाज येईल की या कुत्र्याची परिसरात किती दहशत आहे. कुत्रा माणसांचा चावा घेण्यासाठी बेफाम सैरावैरा फिरतोय. त्याच्या हल्यापासून वाचण्यासाठी लोकांची पळापळ आपल्याला पाहायला मिळते.