Traffic Rules : भारतात असंख्य लहान मोठे रस्ते आहेत. या रस्त्यांवरून दर दिवशी कोट्यवधी वाहनं, व्यक्तींची ये-जा होत असते. हा एक असा देश आहे, जिथे दर दिवशी एखादा आजार किंवा अपघातांमध्ये सर्वाधिक नागरिक आपला जीव गमावतात. परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन नियम बनवतं, पण त्यांचं पालन होतंच असं नाही.
अपघातांविषयी सांगावं तर रस्ते अपघाताच जीव गमावणाऱ्यांचा आलेख गेल्या काही दिवसांमध्ये उंचावत आहे. (Traffic Rules ) रस्ते वाहतुकीचे नियम फक्त सिग्नलपर्यंतच मर्यादित आहेत असा अनेकांचा समज. पण, तसं नाहीये.
रस्त्यावरून जाताना तुम्ही एक बाब पाहिली असेल, की रस्त्यावर एकतर पांढऱ्या किंवा मग पिवळ्या रंगांच्या पट्ट्या असतात. तुटक रेषा, लांबलचक रेषा असे या रेषांचेही विविध प्रकार. या विविध रंगांच्या रेषाही तितक्याच महत्त्वाच्या. (Traffic Rules white yellow lines importance )
सरसकट एकच लांबलचक पांढरी रेष असल्यास तुम्ही वाहन चालवताना लेनची शिस्त पाळणं अपेक्षित असतं. अशी रेष असल्यास तुम्ही लेन बदलू शकत नाही.
रस्त्यावर तुटक रेषा असल्यास लक्षात घ्या, की तुम्हाला लेन बदलता येऊ शकते. पण, अशा वेळी तुम्ही मागून येणाऱ्या वाहनांवर लक्ष देणं अपेक्षित असेल.
एखाद्या रस्त्यावर दोन लांबलचक पांढऱ्या रेषा असल्यास हा एक महत्त्वाचा इशारा असतो. इथं तुम्हाला ओव्हरटेक करण्यासोबतच लेन बदलण्याचीही परवानगी नसते.
बऱ्याच रस्त्यांवर लांबलचक पिवळी रेष असते. अशी रेष दिसल्यास तुम्ही सहज ओव्हरटेक करु शकता असा तिचा अर्थ. हो, पण असं करताना तुम्हाला लेन बदलता येणार नाही. बऱ्याच राज्यांनुसार या रेषेशी संबंधित नियम बदलल्याचं पाहायला मिळतं.
एखाद्या रस्त्यावर पिवळ्या रंगाच्या दोन लांबलचक रेषा एकत्र दिसल्यास लेनची शिस्त पाळणं बंधनकारक असल्याचा इशारा असतो.