Fact Check : कॅडबरीमध्ये बीफ, हलाल सर्टिफाइड जिलेटिन?

कंपनीवर आरोप आहे कि कंपनी आपल्या काही प्रोडक्टसमध्ये बीफपासून बनलेल्या  हलाल सर्टिफाइड जिलेटिनचा वापर करते

Updated: Oct 30, 2022, 01:33 PM IST
 Fact Check : कॅडबरीमध्ये बीफ, हलाल सर्टिफाइड जिलेटिन? title=

#BoycottCadbury: सध्या ट्विटरवर कॅडबरी विरोधात ट्विटर वॉर सुरु आहे  Boycott Cadbury Trend सध्या जोरात चालू आहे. कंपनीवर आरोप आहे कि कंपनी आपल्या काही प्रोडक्टसमध्ये बीफपासून बनलेल्या  हलाल सर्टिफाइड जिलेटिनचा वापर करते. चला तर जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे. आपण खात असलेली कॅडबरी खरंच कशापासून बनतेय. (Trending boycott cadbury trending twitter halal certified gelatine derived from beef viral know the truth controvercy)

कॅडबरीचा बहिष्काराचा ट्रेंड #BoycottCadbury ट्विटरवर सकाळपासून सुरू आहे. हॅशटॅगसह एक स्क्रीनशॉटही व्हायरल झाला आहे.  #BoycottCadbury Trends करणाऱ्यांचा आरोप आहे आहे कि कॅडबरी आपल्या उत्पादनांमध्ये हलाल सर्टिफाइड जिलेटिनचा वापर करते. 

हे जिलेटिन बीफमधून काढले जात असल्याचा दावा केला आहे.

#bannedcadbury

या आधी सुद्धा कॅडबरी कंपनीवर आरोप लागले होते

 कॅडबरीबाबतचा हाच दावा गेल्या वर्षी जुलैमध्ये व्हायरल झाला होता.त्यावेळी खुद्द कंपनीने आपली प्रतिक्रिया दिली होती.  "कृपया लक्षात ठेवा, आमच्या कोणत्याही उत्पादनात जिलेटिन असल्यास, आम्ही वापरत असलेले जिलेटिन हलाल प्रमाणित आहे आणि ते गोमांसापासून घेतलेले आहे,"  व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉट  (viral screenshot aboy cadbury) मध्ये असच लिहिल्याचं दिसत आहे. (Trending boycott cadbury trending twitter halal certified gelatine derived from beef viral know the truth controvercy)

 नेमकं सत्य काय आहे ?

गेल्या वर्षी असाच ट्रेंड चालू झाला होता त्यावेळी कंपनीने एक दावा केला होता  कि व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटचा आणि भारताचा काहीही संबंध नाही. ही पोस्ट गेल्या वर्षी 18 जुलै रोजी कॅडबरी डेअरी मिल्कच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आली होती.

कंपनीने स्पष्टपणे सांगितले होते की भारतात उत्पादित आणि विकली जाणारी सर्व उत्पादने 100% शाकाहारी आहेत.तुम्ही व्हायरल झालेला स्क्रीनशॉट काळजीपूर्वक पाहिला असेल, तर तुम्हाला कळेल की वेबपेज कॅडबरी ऑस्ट्रेलियाचे आहे (cadbury.com.au).

#bannedcadbury

डेअरी मिल्क इंडियाने (dairymilk india) गेल्या वर्षी म्हटले होते की, "अशा नकारात्मक पोस्टमुळे आमच्या आदरणीय आणि लोकांच्या पसंतीच्या ब्रँडवरील विश्वासाला हानी पोहोचते हे तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता." आम्ही आमच्या ग्राहकांना अशा नकारात्मक पोस्ट पुढे शेअर करण्यापूर्वी आमच्या उत्पादनांशी संबंधित तथ्य तपासण्याचे आवाहन करतो.'' (Trending boycott cadbury trending twitter halal certified gelatine derived from beef viral know the truth controvercy)

त्यामुळे कुठल्याही ट्रेन्डसोबत जाताना आधी सत्यता तपासून पहा.