Saving Account: भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India)3 महिन्यांत 3 वेळा रेपोदरात (Repo Rate)वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांवर EMIचा बोजा वाढणार आहे. यासोबतच आता बँकेच्या डिपॉजिट स्कीम्स म्हणजे Fixed Deposit Scheme आणि सेव्हिंग अकाउंटवर जास्त रिटर्न मिळणार आहे. अशात Federal Bank फेडरल बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या बँकेतील ग्राहक आता मालामाल होणार आहेत. कारण या बँकेतील सेव्हिंग अकाउंटवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
1. 5 कोटींपेक्षा कमी बचत खातं - रेपो दरापेक्षा 2.40% कमी व्याजदर
2. 5 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर - 3% व्याज
3. 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी - 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रेपो दरावर 2.40% कमी व्याजदर
म्हणजे बँक सध्या ग्राहकांना 3.00% व्याजदर देत आहे. त्याच वेळी, उर्वरित रकमेवर 3.35% व्याजदर देणार आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बँक तुम्हाला कधी व्याज देणार. तर प्रत्येक महिन्याच्या शेवटी ग्राहकांच्या खात्यात जमा रकमेवर व्याज कॅलकुलेशन केलं जाणार. यापूर्वी बँकेने आपल्या सेव्हिंग अकाउंटवर व्याजदर वाढविला आहे.
वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकडून हे महत्त्वाचे पाउल मानलं जात आहे. आतापर्यंत बँकेने चार महिन्यांत रेपो दरात 3 वेळा वाढ केली आहे. तर किरकोळ महागाई देशात सलग सहा महिन्यांपासून वाढत आहे. त्यामुळे किरकोळ महागाईचा दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान राहावा असं आरबीआयचे लक्ष्य आहे.