VIDEO : वराने वधूला बुटाने हाणलं, केसांना ओढलं; लग्नाच्या स्टेजवर हाय व्होल्टेज ड्रामा

Viral Video : लग्न राहिलं बाजूला नवरदेव आणि नवरीचा लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवरदेवाचं रौद्ररुप पाहून वऱ्हाडीमंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. 

Updated: Jan 16, 2023, 09:12 AM IST
VIDEO : वराने वधूला बुटाने हाणलं, केसांना ओढलं; लग्नाच्या स्टेजवर हाय व्होल्टेज ड्रामा title=
Trending Video groom hits bride High voltage drama wedding day viral on Social media

Trending Video :  लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास आणि आनंदाचा क्षण असतो. नवरदेव आणि नवरीसह (groom bride video) हा दोन कुटुंबियांचा मिलनाचा सोहळा. लग्नाचे पारंपारिक विधी, मित्रमंडळी, नातेवाईक, संगीत, नृत्य, फुलांची सजावट आणि मेजवानी हा प्रत्येक लग्नाचा थाट...महिलांमंडळीमध्ये तर लग्नाचा दिवशी वेगळाच उत्साह दिसून येतो. वेगवेगळी साडी, दागिनी आणि हेअरस्टाईल...लग्न (wedding video) मंडपात सगळीकडे उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतं. पण सध्या सोशल मीडियावर (Social media Video) व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) एक वेगळंच दृश्यं पाहिला मिळालं. नवरदेवाचं रुप पाहून उपस्थित सगळ्यांना जोरदार धक्का बसला. 

नवरदेवाचं रौद्ररुप!

लग्नात क्षुल्लक कारणावरुन भांडणं होणं ही सामान्य गोष्ट आहे. मानपान तर कधी जेवण्याच्या मेन्यूवरुन लग्नात थोडे फार रुसवेफुगवे होतातच, त्यात काही नवलं नाही. पण सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला.  (Trending Video groom hits bride High voltage drama wedding day viral on Social media)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वधू आणि वर एकमेकांसमोर लग्नाच्या स्टेजवरच त्यांची शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. मात्र, वराला अचानक एवढा राग आला की, त्याने नवरीला बुटाने मारलं. एवढंच नाही तर केस ओढून तिच्यावर हल्ला केला. स्टेजवरील नातेवाईकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो कोणालाही जुमानत नव्हता. 

व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ कश्यप_मेमरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. लग्नातील या विचित्र आणि धक्कादायक घटनेने नेटकरी हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल माहिती समोर आली नाही.