व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवला Cyrus Mitri यांचा करुण अंत, पाहा धक्कादायक Video

या अपघाताचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना  'सायरस मित्री' यांची (Cyrus Mitri) आठवण होते आहे. 

Updated: Sep 27, 2022, 02:28 PM IST
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवला Cyrus Mitri यांचा करुण अंत, पाहा धक्कादायक Video title=
trending video tractor car Accident on Social Media viral NM

Accident Video: सोशल मीडियावर एक भयानक आणि खतरनाक अपघाताचा व्हिडीओ (shocking video) व्हायरल होतो आहे. (viral on social media) या अपघाताचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना  'सायरस मित्री' यांची (Cyrus Mitri) आठवण होते आहे. मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) आणि ट्रॅक्टरची (tractor) जोरदार धकड झाली ज्यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याच दिसतं आहे. विरुद्ध दिशेने येणारा ट्रॅक्टर चुकीच्या बाजूने येऊन मर्सिडीज बेंझला धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तर कारमधील प्रवासी सुरक्षित आहेत. 

ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले (The tractor broke into two parts)

या 38 सेकंदाच्या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की अपघातात काही लोकांनी मर्सिडीज बेंझ कारच्या पुढील भागाचे नुकसान केले आहे. तर ट्रॅक्टरचे दोन तुकडे आहेत. होय, त्याच्या इंजिनचा भाग एका बाजूला पडलेला आहे, तर ड्रायव्हर सीटचा भाग दुसऱ्या बाजूला आहे. रस्त्यावरून वाहने येत आहेत आणि लोक तिथे उभे राहून ही जोरदार धडक समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.(trending video tractor car Accident on Social Media viral NM)

या अपघाताचा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. ही क्लिप एका IIS अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केली आहे. तर या व्हिडीओला आतापर्यंत शेकडो व्ह्यूज आणि काही लाईक्स मिळाले आहेत. ही घटना आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) तिरुपतीजवळील (Tirupati) चंद्रगिरी बायपास रोडची (Chandragiri Bypass Road) आहे. 

पाहा भीषण अपघाताचा व्हिडीओ (Watch viral video)