Mahakal Mandir Dance Viral Video : उज्जैनच्या (Ujjain) श्री महाकाल मंदिरात दोन महिला सुरक्षारक्षकांनी (Security) बॉलिवूडच्या (Bollywood) हिंदी गाण्यावर (Hindi Songs) डान्स करत त्याचा व्हिडिओ (Video) बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या ग्रभ ग्रह आणि नंदी हॉलमध्ये मोबाईल आणणं बंदी आहे. यानंतरही या महिलांनी मोबाईलवर व्हिडिओ बनवल्याने चर्चा रंगली आहे. ही पहिलीच घटना नाहीए, याआधीही अशा अनेक घटना इथे घडल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
महाकाल मंदिरात रिल्स
जगातील प्रसिद्ध उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात मोबाईलवर बॉलीवूडच्या हिंदी गाण्यांवर व्हिडिओ बनवण्याच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीए. यातच आता मंदिरातीलच दोन महिला सुरक्षा रक्षकांच्या व्हिडिओने खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ
'जीने के बहाने लाखों... आणि प्यार-प्यार करते-करते...' यो गाण्यांवर या महिला कर्मचारी डान्स करताना व्हिडिओत दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. दोनही महिला सुरक्षारक्षकांची ओळख पटवण्यात आली. पूनम सेन आणि वर्षा नवरंग असं या महिला सुरक्षारक्षकांचं नाव आहे. त्या मंदिरात तैनात होत्या. मंदिर प्रशासनाने या दोघींना तात्का निलंबित केलं आहे.
उज्जैन महाकाल मंदिरात सुरक्षा रक्षकांचा मंदिर परिसरात डान्स, व्हिडिओ व्हायरल #Mahakal #Ujjain #MahakalTemple #ViralVideo pic.twitter.com/4qeG6Iy9lB
— Harshal Jadhav (@harshal_rj) December 4, 2022
उज्जैनचे एसडीएम संतोष टॅगोर यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघींनी मंदिरातील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मंदिरात व्हिडिओ बनवणं हे मंदिरांच्या नियमांविरोधात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
याआधीही मंदिरात व्हिडिओ रिल्स बनवण्याचे प्रकार समोर आले आहेत. विशेष म्हणजे मंदिराच्या गर्भ ग्रह आणि नंदी हॉलमध्ये मोबाईलला बंदी असतानाही अनेकजण मोबाईल घेऊन जातात. त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.