मोदींच्या स्वच्छता अभियानावर राधामोहन सिंग यांची 'लघुशंका'

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासलाय.

Updated: Jun 29, 2017, 04:13 PM IST
मोदींच्या स्वच्छता अभियानावर राधामोहन सिंग यांची 'लघुशंका' title=

नवी दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासलाय. राधामोहन सिंह उघड्यावर लघुशंका करतानाचा फोटो सध्या व्हायरल झालाय. हा फोटो नेमका कुठला आहे किंवा कधीचा आहे याबद्दल माहिती उपलब्ध झालेली नाही.

पण फोटतली व्यक्ती राधामोहन सिंहच आहे हे स्पष्ट आहे. स्वच्छ भारत अभियान ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या किती जिव्हाळ्याचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही, त्यामुळे राधामोहन सिंहांकडून झालेल्या या कृत्याची पंतप्रधान दखल घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.