रॉयल कारभार, नवरा नवरीने हेलकाप्टरमधून वाटल्या लग्न पत्रिका, पाहा व्हिडीओ

आपल्याकडे लग्नापूर्वी आपल्या कुटूंब मंडळींकडे लग्नाचे कार्ड वाटप करण्याची परंपरा आहे.

Updated: Jul 17, 2021, 08:57 PM IST
रॉयल कारभार, नवरा नवरीने हेलकाप्टरमधून वाटल्या लग्न पत्रिका, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : प्रत्येक वधू-वराला त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय बनवण्याची इच्छा असते त्यासाठी ते काहीही कसर सोडत नाहीत. आजकाल थीम वेडिंगचा ट्रेंडही बराच वाढला आहे. त्याच वेळी, ज्यांच्याकडे पैशाची कमतरता नाही, असे लोकं अफाट पैसे खर्च करतात. फक्त त्यांना बाकीच्या लोकांपेक्षा वेगळ्या प्रकारे लग्न करायचे असते. त्यासाठी ते कितीही पैसे मोजायला तयार असतात. अशाच एका लग्नाशी संबंधीत व्हिडीओचा व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वधू-वरांनी त्यांचे लग्न अविस्मरणीय करण्यासाठी अशी गोष्टं केली आहे, जी खरोखरच सगळ्यांपेक्षा वेगळी आहे.

आपल्याकडे लग्नापूर्वी आपल्या कुटूंब मंडळींकडे लग्नाचे कार्ड वाटप करण्याची परंपरा आहे. हिच परंपरा या जोडप्याने पार पाडली परंतु काहीशा वेगळ्या पद्धतीने. सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर वेडिंग कार्ड्स वितरित करण्याचा एक अप्रतिम रील्स व्हायरल झाला आहे.

काही लोकं हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले, तर काही लोकांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांकडे पैसे आहेत ते लोकं असा पैसा वाया घालवतात.

या लग्नाच्या व्हिडीओमध्ये वधू आणि वर हेलिकॉप्टरमध्ये बसून आपल्या लग्नाचे कार्डे वाटत आहेत.

दुल्हनिया डॉट कॉम वर हा रील्स व्हिडीओ शेअर केला गेला आहे. यात नवरी तिच्या लग्नाच्या कपड्यात आणि भरगच्च दागिन्यांमध्ये दिसत आहे. या नवरीच्या चेहर्‍यावरील हसू आणि चमक पाहण्यासारखे आहे. तिच्या लग्नाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यामुळे वधू आणि वराने कानात हेडफोन घातला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हायरल व्हिडीओ 7 लाख 94 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. परंतु यावर येणारे बरेच कमेंट्स हे नकारात्मक आहेत. लोक याला पैशांचा अपव्यय होत असल्याचे सांगत आहेत. तर काही यूझर्स खोचक पणे सांगित आहेत की, आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की, कोणत्या नातेवाईकांसाठी यांनी हवेत कार्ड उडवले? यांचे नातेवाईक काय हवेत रहातात का? असे देखील लोकांनी म्हटले आहे.