Higway वर 300 किमीचा स्पीड, हातात मोबाईल... रिल बनवताना प्रसिद्ध Youtuberचा मृत्यू

महामार्गावर 300 किमीच्या वेगाने बाईक चालवणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबरचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वेगाने बाईक चालवत असताना तो व्हिडिओ बनवत होता. पण दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात घडला

Updated: May 4, 2023, 02:41 PM IST
Higway वर 300 किमीचा स्पीड, हातात मोबाईल... रिल बनवताना प्रसिद्ध Youtuberचा मृत्यू title=

Youtuber Agastya Chauhan Death : वेगवेगळ्या विषयांवर रिल (Reels) बनवून ते सोशल मीडियावर (Social Media) टाकण्याची सध्या तरुणाईमध्ये क्रेझ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होते. यासाठी मग काही जण कोणताही धोका पत्करायला तयार असतात. लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी काही जण जीव धोक्यात घालून व्हिडिओ बनवतात, पण काही वेळा हा धोका त्यांच्या जीवावर बेततो. अशीच एक घटना समोर आली असून यात प्रसिद्ध युट्यूबरचा मृत्यू (youtuber died) झाला आहे.

एक्सप्रेस वेवर अपघात
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलिगढमधल्या यमुना एक्स्प्रेसवर (Yamuna Expressway) एक प्रसिद्ध युट्यूबर 300 किमी प्रती तास वेगाने बाईक चालवत होता. पण दुचाकीचं नियंत्रण सुटलं आणि दुचाकी डिव्हाईडकरला धडकली. दुर्देवाने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्या बाईकचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताचा माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाटून दिला असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. 

वेगाने घेतला जीव
या युट्यूबरचं नाव अगस्त्य चौहान असं असून तो आपल्या रेसिंग बाईकवरुन आगऱ्याहून दिल्लीला जात होता. 300 किमी वेगाने बाईक चालवतानाच अगस्त एका मोबाईल धरून सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी आपली एक रिल बनवत होता. पण बाईक अनियंत्रित झाली आणि बाईक डिव्हायडरला धडकली. अगस्त्यने हेल्मेट घातलं होतं, पण यानंतरही त्याचा जीव वाचू शकला नाही. डोकयाला गंभीर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. (Youtuber Agastya Chauhan Death)

सोशल मीडियावर लाखो सब्सक्राइबर
अगस्त्य चौहान हा मुळचा दिल्लीत राहाणार आहे. तो आपलं एक युट्यूब चॅनल चालवत होता. यासाठी वेगवेगळे धाडसी व्हिडिओ बनवायचा. यूटयूबर त्याचे लाखो सबस्क्रायबर असून त्याच्या एका-एका व्हिडिओला करोडो व्ह्यूज मिळत होते. अगस्त बाईक रायडिंगचे थरारक व्हिडिओ बनवायचा. विशेष म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओत फॉलोओर्सना तो वेगाने दुचाकी चालवू नका असा संदेश द्यायचा. पण दुर्देवाने त्याचाच वेगाने बळी घेतला.

दिल्लीत होणाऱ्या लॉंग राइड स्पर्धेत भाग घेण्यासाठी अगस्त्य चौहान आगराहून दिल्लीला येत होता. यमुना एक्स्प्रेसवर वेगाने बाईक चालवण्याचा मोह त्याला झाला आणि तब्बल 300 किमी प्रती तास वेगाने तो बाईक चालवत होता. पण हा प्रवास त्याच्या आयुष्यातला अखेरचा प्रवास ठरला.