उत्तर प्रदेशात यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात, सात ठार तर ३२ जखमी

उत्तर प्रदेशात बसला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ३२ लोक जखमी झाले आहेत.  

Updated: Oct 17, 2020, 07:09 AM IST
उत्तर प्रदेशात यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात, सात ठार तर ३२ जखमी

लखनऊ : उत्तर प्रदेशात बसला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ३२ लोक जखमी झाले आहेत. हा अपघात पीलीभीतमध्ये राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीलीभीतमध्ये एक बस यात्रेकरूंना घेऊन जात होते. या बसला भीषण अपघात झाला. बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने हा मोठा अपघात झाला. या अपघातात सात जण ठार झालेत. तर ३२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ७३० वर हा अपघात झाला आहे. बस लखनऊहून पूरनपूरला निघाली होती.