नवी दिल्ली : भारतात बँकिंग घोटाळ्याच्या घटनांमध्ये सरकारी कारवाईचे परिणाम दिसून येत आहेत. अंमलबजावणी संचालनालय (ED )ने बँकिंग घोटाळ्याचे फरार आरोपी विजय मल्या, मेहूल चौक्सी आणि नीरव मोदीची एकून 9371 कोटींची संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. ईडीने ही माहिती दिली आहे.
आतापर्यंत 18 हजार कोटींहून अधिक संपत्ती जप्त
ईडीच्या माहितीनुसार विजय मल्या, मेहूल चौक्सी आणि नीरव मोदींसारख्या फरार आरोपींची आतापर्यंत एकूण 18 हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती अटॅच किंवा सील करण्यात आली आहे. ही रक्कम बँकांच्या एकूण नुकसानीच्या 80 टक्के आहे. PMLA अंतर्गत जप्त केलेली संपत्ती पब्लिक सेक्टर बँका आणि केंद्र सरकारला देखील ट्रान्सफर करण्यात आली आहे.
22 हजार कोटींचा बँकिंग फ्रॉड
विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीने मिळून सरकारी बँकांचे 22 हजार कोटींहून अधिक रक्कमेचा घोटाळा केला होता. CBI द्वारे FIR केल्यानंतर ED ने कारवाई करीत डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल देवाण घेवाणीची चौकशी करीत अब्जावधींची संपत्ती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण संपत्तीपैकी 969 कोटी रुपयांची संपत्ती विदेशात आहे.