धावत्या मेट्रोमध्ये माकडाची सर्कस... पाहा जबरदस्त व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही कळेल की, या माकडाने मेट्रोमधून कसा दिल खुलास प्रवास केला आहे.

Updated: Jun 20, 2021, 01:40 PM IST
धावत्या मेट्रोमध्ये माकडाची सर्कस... पाहा जबरदस्त व्हिडीओ

दिल्ली : कोरोनामुळे दिल्लीच काय तर मुंबईत ही ट्रेन बंद केल्या गेल्या होत्या. त्यामुळे अनेकांना ट्रेनमधून प्रवास करण्यावर मनाई घालण्यात आली होती. त्यामुळे असे काही लोकं आहेत ज्यांनी अनेक महिने ट्रेन किंवा मेट्रेने प्रवास केला नाही. त्यामुळे ते या प्रवासाला खूप मिस करत आहेत. अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर दिल्लीमधील मेट्रो सुरु करण्यात आली आहे. त्यावेळेनंतर माणसांसोबतच एका माकडालाही या मेट्रोमधून प्रवास करण्याचा मोह आवरला नाही. ज्यामुळे त्याने अखेर मेट्रोने प्रवास केलाच.

माकडाने मेट्रोमधून केलेल्या प्रवासात काय धमाल केली आणि त्याने प्रवास कसा केला? याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्वीटरवर Paramjit Dhillon नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही कळेल की, या माकडाने मेट्रोमधून कसा दिल खुलास प्रवास केला आहे. तो या मेट्रोमध्ये चढल्यानंतर,  एखाद्या लहान मुलाप्रमाने सगळ्या गोष्टींकडे कौतुकाने पाहातो.  मेट्रोच्या खांबावर लटकतो, प्रवाशांच्या बाजूला जाऊन बसतो, त्यांच्या मांडीवर प्रेमाने हात ठेवतो. एवढचं नाही तर, तो मेट्रोच्या खिडकीतून बाहेरील दृष्याचा आनंद घेत आहे.

या व्हिडीओने अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले आहे. अनेकांना या माकडाचे कौतुक देखील वाटत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यावर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. या पोस्टला अनेक लोकांनी शेअर देखील केला आहे.