Small boy playing with python: लहान मुलाने दहापट मोठ्या अजगराला उचललं, छातीशी लावलं, पुढे काय झालं? पाहा

साप हा शब्द ऐकल्यावर अनेकांना भीती वाटते. मात्र, काही 'खतरों के खिलाडी' असेही असतात जे या सापांची पप्पी काय घेतात, त्यांच्यासोबत खेळतात किंवा अगदी वाट्टेल ते करतात.

Updated: Aug 21, 2022, 06:09 PM IST
Small boy playing with python: लहान मुलाने दहापट मोठ्या अजगराला उचललं, छातीशी लावलं, पुढे काय झालं? पाहा title=

Small boy playing with python: साप हा शब्द ऐकल्यावर अनेकांना भीती वाटते. मात्र, काही 'खतरों के खिलाडी' असेही असतात जे या सापांची पप्पी काय घेतात, त्यांच्यासोबत खेळतात किंवा अगदी वाट्टेल ते करतात.

जर तुम्हाला आम्ही जे बोलतोय यावर विश्वास नसेल, तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला मोठा शॉक बसल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हा लहान मुलगा आणि हा भला मोठा अजगर मित्र आहेत की काय असं नक्की वाटेल.

या व्हिडिओमध्ये एका निरागस लहान मुलगा पाहायला मिळतोय. मात्र या मुलाने जे काम करून दाखवलंय ते काम मोठी माणसंही करू शकत नाही, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.

सर्वात आधी हा व्हिडीओ पाहा

मुलाने दहापट मोठ्या बलाढ्य अशा अजगराला उचललं

या व्हिडिओमध्ये हा लहान मुलगा त्याच्यापेक्षा दहापट मोठ्या अजस्त्र अशा अजगराला उचलण्याचा प्रयत्न करतो आहे. यानंतर हा लहान मुलगा या अजगराला आपल्या छातीशी धरतो. असं काही करण्याआधी अनेक जण हजारदा विचार करतील. मात्र हा लहान मुलगा अगदी सहजतेने या अजगराला उचलून छातीशी लावतोय.

सापाला किंवा अजगराला कुठल्या गोष्टींपासून धोका जाणवला, की ते समोरच्यावर हल्ला करताना आपण पाहिलं आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये अजगर आणि लहान मुलगा मित्र असल्यासारखे एकमेकांशी खेळत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आणि आता त्यावर हजारो व्ह्यूज येताना पाहायला मिळतायत. यावर अनेकजण कमेंट्स देखील करत आहेत. काहींनी मुलाला बहाद्दूर म्हंटलं आहे तर काहींनी लकी म्हंटलं आहे.

viral video of small boy playing with huge indian python video goes viral

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x