Viral Video : सोशल मीडियावर क्षणाक्षणाला जगभरातील बहुविध व्हिडीओ, फोटो, रील्स व्हायरल होत असतात. लक्ष वेधणारी दृश्य, भारावणारी दृश्य, काहीशी विचार करायला भाग पाडणारी दृश्य असा एकंदर माहोल असतो या वर्तुळात. याच अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या विश्वात सध्या एका तरुणीची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.
ही तरुणी कोणी सेलिब्रिटी नाही, कोणी इन्फ्लुएन्सर नाही, कोणी रिलस्टार तर नाहीच नाही. किंबहुना ही मुलगी एका रीलमुळं प्रसिद्ध झाली असून, तिच्या रुपावर सगळेच भाळले आहेत. व्हिडीओमधील दृश्य आणि या तरुणीचा एकंदर पेहराव पाहता ती राजस्थानातील असून, ती तिथं स्थानिकांशी संवाद साधताना दिसत आहे.
अतिशय सामान्य, पारंपरिक वेशात असणाऱ्या या तरुणीनं कोणताही मेकअप केलेला नाही, कोणतेही महागडे दागिनेही घातलेले नाहीत. पण, तिच्या चेहऱ्यावरील अनोखं हास्य आणि तिचा साधोपणाच रुप आणखी उठावदार करत असून, तिला नकळत प्रकाशझोतात आणत आहे.
एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यानंतर तो इतरही युजर्सनी शेअर केला. 'ही राजस्थानी महिला तिच्या नैसर्गिक आणि लाघवी सौंदर्यासाठी ओळखली जाते. अनेकजण तिच्या सौंदर्याची तुलना आघाडीच्या मॉडेलसोबत करत आहेत. तिची पारंपरिक वेशभूषा फक्त स्थानिक पर्यटकांचच नाही, तर तिथं येणाऱ्या परदेशी पर्यटकांचंही लक्ष वेधत आहे.' असं एका व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी यावर असंख्य प्रतिक्रिया केल्या असून, कोणी म्हणतंय या तरुणीचं सौंदर्य 100 बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्यालाही मागं टाकेल. तर कोणी थेट सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीला कमेंटमध्ये टॅग करत या तरुणीला मॉडेलिंग क्षेत्रात नवी ओळख देण्यासाठीची अप्रत्यक्ष विनंतीच केली आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहून काय म्हणाल?