रेल्वे रुळावर बाईक चालवताना समोरुन आली ट्रेन, जीव वाचवण्यासाठी तरुणाचा आश्चर्यकारक जुगाड, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमधील व्यक्तीची युक्ती पाहून तुम्ही आश्चर्यचकित देखील व्हाल.

Updated: Jan 12, 2022, 12:19 PM IST
रेल्वे रुळावर बाईक चालवताना समोरुन आली ट्रेन, जीव वाचवण्यासाठी तरुणाचा आश्चर्यकारक जुगाड, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे. जेथे आपल्याला रोज काही ना काही कंटेन्ट पाहायला मिळतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. आपण असे व्हिडीओ पाहातो, त्याचा आनंद घेतो आणि आपल्या मित्रांना देखील असे व्हिडीओ शेअर करतो. सोशल मीडियावरती आपल्या काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्या थक्क करतात आणि असेच विचित्र किंवा वेगळे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात.

सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो तसे पाहाता भीतीदायक आहे. परंतु त्यामधील व्यक्तीची युक्ती पाहून तुम्ही आश्चर्यचकित देखील व्हाल.

आपल्याला हे माहित आहे की, सोशल मीडियावर आपला व्हिडीओ व्हायरल किंवा ट्रेंडिंग होण्यासाठी काही लोक आपल्या जीवाशीही खेळतात. मग त्याचा परिणाम काहीही असो त्यांना काही फरक पडत नाही.

इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी हा तरुण आपल्या जीवावर खेळत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुणाने जीवाचीही पर्वा केली नाही. मात्र, जेव्हा त्याच्या जीवावर बेतण्याची वेळ येते तेव्हा तो कसा बसा आपला जीव वाचवतो.

इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी हा तरुण आधी बाईक घेऊन रेल्वे ट्रॅकवर जातो. तो रेल्वे ट्रॅकवर दुचाकी चालवत आहे. हे रेल्वे रुळ एका मोठ्या ब्रिजवरती असतो. जो दरीच्यामध्ये असतो, त्यामुळे त्या रुळावरुन ट्रेन आली तरी तेथे बाजूला थांबायला ही जागा नाही आणि इतक्या जीवघेण्या रेल्वे रुळावरुन हा तरुण बाईक चालवतो.

हा तरुण तेथून बाईक चालवत असताना समोरुन ट्रेन येते. ज्यामुळे या तरुणाला धक्का बसतो. पण तुम्ही व्हिडीओमध्ये बघू शकता की समोरून ट्रेन येत असल्याचे पाहून तो मुलगा घाबरून न जाता एक युक्ती लावतो. ती युक्ती तशी जिवघेणीच आहे. परंतु नशीबाने त्या तरुणाचे प्राण वाचतात.

तरूण आधी आपली बाईक रुळांच्या कडेला पडलेली सोडून देतो आणि स्वतः पुढे धावतो आणि थोड्या अंतरावर असलेल्या खांबाला धरून उभा राहतो. तो ज्या प्रकारे उभा राहतो हे पाहून तुम्हाला समजेलच की हे करणं किती भीतीदायक आणि जीवघेणं आहे. परंतु हा तरुण आपल्या युक्तीने स्वत:चा जीव आणि बाईक दोन्ही वाचवतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ ट्रेनमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने बनवला आहे. त्यानंतर तो इंटरनेटवर व्हायरल केला गेला. हा व्हिडीओ कुठला आहे हे सध्या तरी कळू शकलेले नाही. परंतु यावर युजर्सच्या भरभरुन कमेंट्स आल्या आहेत.