'निर्भया' कांडातील दोषी बनला सरकारी यंत्रणेचा 'पोस्टरबॉय'

पंजाबमधील होशियारपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर असे पोस्टर छापलेत

Updated: Jul 20, 2019, 08:36 PM IST
'निर्भया' कांडातील दोषी बनला सरकारी यंत्रणेचा 'पोस्टरबॉय' title=

रमण खोसला, झी २४ तास, होशियारपूर, पंजाब : सरकारी यंत्रणा किती 'पाट्या टाकू' काम करते, याचा प्रत्यय पंजाबामध्ये समोर आलाय. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी 'निर्भया' कांडातील बलात्कारी दोषी मुकेशला पोस्टरबॉय बनलाय. 

सरकारी यंत्रणेतल्या पाट्या टाकू संस्कृतीवर भाष्य करणारा 'पोस्टरबॉय' हा मराठी सिनेमा तुफान गाजला होता. ही पाट्या टाकू संस्कृती भारतीय प्रशासनात ठासून भरलीय. पंजाबमधील होशियारपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर पोस्टर छापले. या पोस्टरवर चक्क निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी मुकेशचा फोटो वापरला गेला.

हे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यातही आले. एक पोस्टर ट्विटरवर झळकल्यानंतर पोस्टरबॉय बलात्कार प्रकरणातला दोषी मुकेश असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री विजय संपला यांनी केलीय.

या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईचं आश्वासन दिलंय, असं आश्वासन पंजाबचे कॅबिनेटमंत्री सुंदर श्याम अरोरा यांनी दिलंय.  

आता चौकशी होईल एखाद्या दुसऱ्यावर कारवाई होईल किंवा नाहीही... एवढी मोठी चूक केल्यानंतरही सरकारी यंत्रणा यातून कोणताही धडा घेणार नाही. ही यंत्रणा परत पुढचा 'पोस्टरबॉय' शोधेल यात शंकाच नाही.