WATCH: कार चालकाची मुजोरी! वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, घटनेचा CCTV Video समोर

Social Media Viral Video : नेहमीप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांची (Traffic cop) कारवाई सुरू होती. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याप्रकरणी ट्रॅफिक पोलिसांनी एका कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला.

Updated: Dec 12, 2022, 11:22 PM IST
WATCH: कार चालकाची मुजोरी! वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, घटनेचा CCTV Video समोर title=
Car Driver drags traffic cop

Car Driver drags traffic cop on bonnet: अनेकदा कार चालक आणि वाहतूक कर्मचारी (Traffic Policeman) यांच्यात काही गोष्टींवरून वादविवाद होताना दिसतं. काही वेळा हे वाद टोकाला देखील जातात. अशातच आता इंदोरमधून (Indore CCTV Video) धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंदोरमधील सत्यसाई क्रॉसरोडवर सिग्नलजवळ घडली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (The video footage) होताना दिसत आहे.

नेहमीप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांची (Traffic cop) कारवाई सुरू होती. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याप्रकरणी ट्रॅफिक पोलिसांनी एका कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही कार चालकाने गाडी थांबवली नाही. कारचालकाने कॉन्स्टेबलला धक्का देत गाडी चालू ठेवली. जीव वाचवण्यासाठी कॉन्स्टेबल बोनेटवर चढला. (A traffic policeman was seen being carried by a driver on top of his car bonnet)

आणखी वाचा - मथुरेचा Hero! धावत्या ट्रेनमध्ये पोहचवलं औषध; डॉक्टरांच्या मदतीला देवासारखा धावला

कॉन्स्टेबल गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून चालकाचा संताप अनावर झाला आणि त्याने कॉन्स्टेबलला 4 किलोमीटर (Car Driver drags traffic cop on bonnet) फरफटत नेलं. त्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. 

पाहा Video -

दरम्यान, 4 किलोमीटर गेल्यानंतर अथक प्रयत्नांनी पोलिसांनी कार चालकाला रोखलं. त्यानंतर हेड कॉन्स्टेबलला (Head Constable) खाली उतरवत चालकाला अटक (Arrest) केली आहे. त्यानंतर  कॉन्स्टेबलचा जीवात जीव आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.