Budget 2024: कमोडिटी क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 10 सर्वात मोठ्या मागण्या

Budget 2024: निवडणूका तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केटलाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 1, 2024, 08:50 AM IST
Budget 2024: कमोडिटी क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 10 सर्वात मोठ्या मागण्या title=

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. निवडणूका तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केटलाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सहकारी वाहिनी झी बिझनेसशी संवाद साधताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख अनुज गुप्ता यांनी या क्षेत्राच्या आणि उद्योगाच्या अपेक्षा मांडल्या आहेत.

कमोडिटी सेक्टरच्या काय आहे मागण्या?

  • कमोडिटी मार्केटमधील व्हॉल्यूम वाढवण्यासाठी कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स माफ करण्याची मागणी होत आहे.
  • कृषी कमोडिटी फ्युचर कॉन्ट्रॅक्टवरील बंदी हटवून प्राइस डिस्कवरी मॅकेनिझम मजबूत करण्याची मागणी आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, म्युच्युअल फंड, एफआयआय यांना कमोडिटीजमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्याची मागणी आहे, ज्यामुळे लिक्विडीटी वाढणार आहे. वाढेल.
  • सोनं, चांदी, प्लॅटिनम इत्यादी महागड्या धातूंवरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी होताना दिसतेय.
  • कृषी प्रोडक्टच्या ट्रेडमध्ये टेक्नोलॉजी एडवांसमेंटची गरज निदर्शनास आणून दिली ज्यामुळे मार्केटींग ऑपरेशनमध्ये सुधारणा होईल.
  • मोठ्या स्टोरेज सुविधांना प्रमोट करण्यासाठी प्रोत्साहनासारख्या धोरणात्मक बदलांची मागणी करण्यात आली आहे. कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग, डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कमुळे कृषी उत्पादनांचे मार्केटींग सुधारणार आहे.
  • क्रॉप डायवर्सिफिकेशनसाठी सरकारला MSP म्हणजेचमिनिमम सपोर्ट प्राईस पॉलिसीला तर्कसंगत करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
  • बायो-एनर्जी सेक्टर चालणाऱ्या जैव-ऊर्जा क्षेत्रासाठी प्रोत्साहन जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • RBD पामोलिन आणि RBD पॉम ऑईलवर इंपोर्ट ड्यूटी ला 12.5% वरून वाढवून 20% करण्याची मागणी केलीये.
  • सरकारला एग्रीकल्चर टेक्नोलॉजी इंस्टिट्यूटवरही भर देण्याची गरज आहे. शेतकरी शिक्षित असेल तर उत्पादकता चांगली होईल.