स्टाईल मारत महिला सापासमोर गेली आणि... तिच्यासोबत पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर साप आहे. जे पाहून तेथे एक व्यक्ती आणि एक महिला थांबली आहे

Updated: Mar 18, 2022, 10:42 AM IST
स्टाईल मारत महिला सापासमोर गेली आणि... तिच्यासोबत पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : साप पकडणे हा काही लहान मुलांचा खेळ नाही. यांना पकडणारे सर्प मित्र देखील यासाठी अनेक सराव करतात. तेव्हा कुठे जाऊन त्यांना साप पकडणं शक्य होतं. बऱ्याचदा या सापांच्या दंशापासून मोठ-मोठ सर्प मित्र देखील वाचू शकले नाही. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती व्हावं लागलं होतं. तर अनेकांचे प्राण देखील गेले आहे. आता याच संदर्भात एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला रस्त्यावरील सापासोबत असं काही करते की, तुम्हाला ते पाहून आश्चर्य वाटेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर साप आहे. जे पाहून तेथे एक व्यक्ती आणि एक महिला थांबली आहे. त्यानंतर या सापाला पाहून ही महिला हातात सिगरेट घेऊन स्टाईल मारत त्या सापाजवळ जाते आणि 5 सेकंद मोठा श्वास घेते आणि खाली वाकून त्या सापाला पकडते आणि त्याला प्रेमाने उचलते.

ही महिला साप उचलताना तिला हे जमेल की, नाही? याबद्दल लोकांना प्रश्न पडतो. परंतु ही महिला सगळ्यांना खोट ठरवत. सापाला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवते. जे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या महिलेच्या धाडसाला सगळेच लोक सलाम करत आहेत. या महिलेच्या कामगिरीमुळेच या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.

हा व्हिडीओ unilad इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो लोकांना फार आवडला आहे.