जेव्हा अचानक घरात घुसला सिंह

सिंह घरात घुसल्याने एकच खळबळ...

Updated: Nov 12, 2018, 03:22 PM IST
जेव्हा अचानक घरात घुसला सिंह title=

अमरेली : गुजरातमधल्या अमरेलीच्या पातला गावात एका घरात चक्क सिंह घुसला. घराच्या एका कोपऱ्यात भुईमुगाच्या शेंगांचा ढिग रचून ठेवण्यात आला होता. त्या ढिगावर सिंह चक्क ठाण मांडून बसला होता. एका तासानंतर हा सिंह शेवटी घराबाहेर पडला. माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.

अमरेली येथील खांभा जंगलात भटकत असताना सिंह या शेतकऱ्याच्या घरात घुसला. लोकांनी त्याला घरात जातांना पाहिल्याने मोठा अनर्थ टळला. पण बराच वेळ सिंह घरात होता. रात्रीच्या अंधारात जेव्हा सिंह घरात गेला तेव्हा बाहेर बसलेल्या लोकांना त्याला पाहिलं. लोकांचा आवाज ऐकूण मध्ये-मध्ये तो डरकाळी फोडत होता. वन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानतंर सिंहाला पून्हा जंगलात सोडण्यात आलं.