भाजपचा जायंट किलर! मुख्यमंत्री केसीआर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव करणारे कट्टीपल्ली वेंकट आहेत तरी कोण?

Kamareddy assembly constituency : मदर ऑफ ऑल बॅटल, अशी तेलंगाणाची कामारेड्‌डी हा मतदारसंघ बनला होता. 2018 च्या निवडणुकीत बीआरएस उमेदवार गम्पा गोरवधन यांनी ही जागा जिंकली होती. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीतही (Telangana Assembly Elections) काँग्रेसने येथून विजय मिळवला होता. आता कट्टीपल्ली वेंकट (Venkata Ramana Reddy) यांनी दणदणीत विजय मिळवलाय.

सौरभ तळेकर | Updated: Dec 3, 2023, 08:22 PM IST
भाजपचा जायंट किलर! मुख्यमंत्री केसीआर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव करणारे कट्टीपल्ली वेंकट आहेत तरी कोण?  title=
Venkata Ramana

Venkata Ramana Reddy : तेलंगाणामधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत पहिल्यांदाच तेलंगाणामध्ये (Telangana Assembly Elections) सत्ता मिळवली आहे. गेली दहा वर्षे तेलंगणात सत्तेत असलेले मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chief Minister KCR) यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीला (BRS) विधानसभा निवडणुकीत सत्ता गमवावी लागली. भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पातळीवर उतरवण्याचा प्रयत्न करताना मुख्यमंत्री केसीआर यांना स्वत:च्या राज्यात धक्का बसला. गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसला (Congress) पुन्हा एकत्र आणण्यातं काम माणिकराव ठाकरे यांनी केलं अन् काँग्रेसने सर्वांना धक्का देत तेलंगाणामध्ये विजय मिळवला आहे. तेलंगाणामध्ये भाजपला केवळ 8 जागांवर सल्ला मिळवता आली. त्यात भाजपच्या जायंट किलरचा मोठा वाटा होता. मुख्यमंत्री केसीआर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव करणारे कट्टीपल्ली वेंकट (Venkata Ramana Reddy) यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

भाजपच्या कट्टीपल्ली वेंकट यांनी कामारेड्डी विधानसभा मतदारसंघातून तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री केसीआर आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार रेवंत रेड्डी यांचा पराभव केला आहे. कट्टीपल्ली वेंकट यांनी 6741 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना एकूण 66,652 मतं मिळाली. स्वत: मुख्यमंत्री आणि रेवंत रेड्डी यांचं पाणीपत करत कट्टीपल्ली वेंकट हे खऱ्या अर्थाने त्रिशंकू लढाईत जायंट किलर ठरले आहेत.

कोण आहेत Venkata Ramana Reddy ?

कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी हे 53 वर्षांचे असून ते व्यवसायाने व्यापारी आहेत. त्याने फक्त बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. निवडणुकीत घोषित केलेल्या संपत्तीनुसार त्यांच्याकडे सुमारे 50 कोटी रुपयांची संपत्ती आहे. रेड्डी यांच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत, पण त्यांनी कामरेड्डी विधानसभा मतदारसंघात अनेक शाळा आणि रुग्णालये बांधली आहेत. यापूर्वी कामारेड्डी विधानसभेचे प्रभारी आणि निजामाबाद जिल्हा पंचायत अध्यक्षही राहिले आहेत. कामरेड्डी विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या अनुक्रमे 14.73 आणि 4.67 टक्के आहे. याचा फायदा कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांना झाला. 

आणखी वाचा - Assembly Elections : 'आम्ही वचन पूर्ण करू...', तीन राज्यातील पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...

मदर ऑफ ऑल बॅटल, अशी तेलंगाणाची कामारेड्‌डी हा मतदारसंघ बनला होता. 2018 च्या निवडणुकीत बीआरएस उमेदवार गम्पा गोरवधन यांनी ही जागा जिंकली होती. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीतही काँग्रेसने येथून विजय मिळवला होता, मात्र 2023 मध्ये भाजपने ही जागा काबीज केली आहे. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी आपला विजय जनतेला समर्पित केलाय.