लॉकडाऊनच्या काळात एकाचवेळी ७५ पोलिसांनी केलं टक्कल... कारण महत्वाचं

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलिसांनी उचललं हे पाऊल 

Updated: Apr 6, 2020, 02:34 PM IST
लॉकडाऊनच्या काळात एकाचवेळी ७५ पोलिसांनी केलं टक्कल... कारण महत्वाचं  title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा होणारा संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन केलं आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. देशाच्या रक्षणासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. दिवस-रात्र नागरिकांच्या हिताचा विचार करणाऱ्या पोलिसांना देखील आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. याचाच विचार करून ७५ पोलिसांनी चक्क टक्कल केलं आहे. 

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी फतेहपूर सीकरी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. रविवारी या पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह ७५ पोलिसांनी सामुहिक टक्कल केलं आहे. टक्कल केल्यानंतर हे पोलीस जेव्हा बंदोबस्तासाठी बाहेर पडले तेव्हा लॉकडाऊन असूनही नागरिक घराच्या दरवाज्यात, खिडकीत उभं राहून त्यांना बघू लागले. एकाचवेळी ७५ पोलिसांनी केलेल्या टक्कलमुळे नागरीक हैराण झाले आहेत. 

पोलीस ठाण्याचे निरीक्षक भूपेंद्र सिंह बालियान यांनी दिलेल्या माहितीनुसार,'नागरिक तोंडाला मास्क लावण्याबरोबरच डोक्याला देखील रूमाल बांधत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा विषाणू डोक्याच्या केसातही अडकून राहू शकतो. तेथून श्वासाच्या माध्यातमातून तो आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. यामुळेच पोलिसांनी टक्कल करण्याचा निर्णय घेतला. 

टक्कल करणाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षकांसोबतच निरीक्षक अमित कुमार, नऊ उपनिरीक्षक आणि इतर पोलिसांचा समावेश आहे. एकाचवेळी पोलिसांनी टक्कल केल्यावर ते आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी गेले. पोलिसांना या अवस्थेत पाहून स्थानिक नागरीकांना आश्चर्याचा धक्का बसला. लांब केस ठेवणं हे नियमांच्या विरोधात आहे. मात्र टक्कल केल्यामुळे कोणताही नियम मोडलेला नाही.