Knowledge | जीन्स पॅंटला छोटा खिसा का असतो? अखेर उत्तर मिळालंच

जीन्स वापरणाऱ्यांना माहितच असेल की, त्यांच्या उजव्या खिशाच्या वर आणखी एक छोटा खिसा असतो. त्याला छोटे बटन देखील असतात. हा छोटा खिसा का असतो याबाबत तुम्हाला माहिती आहे का?

Updated: Nov 16, 2021, 10:08 AM IST
Knowledge | जीन्स पॅंटला छोटा खिसा का असतो? अखेर उत्तर मिळालंच title=

मुंबई : जीन्स वापरणाऱ्यांना माहितच असेल की, त्यांच्या उजव्या खिशाच्या वर आणखी एक छोटा खिसा असतो. त्याला छोटे बटन देखील असतात. हा छोटा खिसा का असतो याबाबत तुम्हाला माहिती आहे का?

जीन्सची फॅशन कधीही आऊट ऑफ फॅशन झालेली नाही. आणि बहुतेक इवेंटला वापरली जाते. दररोजच्या वापरासाठीही लोकं जीन्सचा वापर करतात. जीन्सला तुम्ही वेगवेगळ्या कंपड्यांसोबत मॅच करून वापरू शकता. आजकाल अनेक प्रकारच्या डिझाइन, कलर आणि स्टाइल्सच्या जीन्स बाजारात उपलब्ध आहेत.

जीन्सला छोटा खिसा का असतो
जीन्सला छोटा खिसा असण्याचा संबध सुरूवातीपासून आहे. खदानीत काम करणाऱ्या लोकांची गरज म्हणून पॅंटला छोटे खिसे बनवण्यात आले. पुढे अशा प्रकारचे खिसे जीन्स पॅंटचा महत्वाचा भाग झाले. जीन्स बनवणारी कंपनी Levis स्टॉर्सच्या अनुसार हे वॉच पॉकेट होते आणि पहिल्या जीन्समध्ये चार खिसे लावण्यात आले होते. ज्यामध्ये एक खिसा एक खिसा मागे, दोन पुढे आणि एक छोटा खिसा होता.

मजूरांना काम करताना गरजेच्या गोष्टी सोबत ठेवाव्या लागत होत्या त्या पडू नये म्हणून मजबूत खिशाची गरज छोट्या खिशाने भरून काढली. तसेच हे खिस कामात खराब होऊ नये म्हणून त्याच्या मजबूतीसाठी टोकांना बटन बसवण्यात आली.

पॉकेटच्या मजबूतीसाठी लावले छोटे बटन 
जीन्सचा कापड रफ ऍंड टफ असल्याने सहजपणे फाटत नाही.परंतु खिशाबाबत मजूरांची खिशाबाबत तक्रार होती. अशातच जेकब डेविसने एक जुगाड केला त्यांनी जीन्सच्या खिशाच्या टोकांना छोटे छोटे मेटलचे बटन लावले.