Piyush Jain Raid : का म्हटलं जातंय सगळ्यात मोठी Cash Raid

पियुष जैनच्या घरावर छापा मारल्यानंतर अधिकारी का झाले स्तब्ध? 

Updated: Dec 29, 2021, 08:49 AM IST
Piyush Jain Raid : का म्हटलं जातंय सगळ्यात मोठी Cash Raid  title=

मुंबई : पियुष जैन या व्यावसायिकाच्या घरी आयकर विभागाने छापा मारला. यामध्ये मिळालेली रोकड रक्कम पाहून डीजीजीआयची टीम आणि आयकर विभागाचे अधिकारी स्तब्ध झाले आहे. आतापर्यंत 200 कोटीहून अधिक संपत्ती एकाच व्यक्तीकडे सापडली नव्हती. त्यामुळे Piyush Jain Raid सध्या चर्चेत आहे. 

फक्त पैसेच नाहीत तर एवढी कुलप आणि चाव्या देखील सापडल्या 

डीजीजीआयने उद्योगपती पीयूष जैन यांच्या घरातून 200 कोटी रोख आणि 23 किलो सोने जप्त केले आहे. छापेमारीत 500 चाव्या, 109 कुलूप आणि 18 लॉकर देखील सापडले आहेत. या छापेमारीतून असा अंदाज वर्तवण्यात येतोय की, पियुष जैनकडे एकूण 1000 कोटी रुपये आहेत. 

अडीच महिन्यापूर्वी पकडलेल्या ट्रकचा या छाप्याशी काय संबंध 

अहमदाबादमध्ये सुमारे अडीच महिन्यांपूर्वी डीजीजीआयच्या पथकाने तपासणीदरम्यान चार ट्रक पकडले होते. तेथून प्रकरणाचा तपास कानपूरला पोहोचला. खोलवर गेल्यावर कळलं की जीएसटी बाचवण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला. 

अहमदाबादमध्ये पकडण्यात आलेल्या ट्रकमध्ये पान मसाला होता. जो कानपुरहून आला होता. तब्बल अडीच महिन्यांनी 22 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता कानपुरच्या शिखर मसाला फॅक्टरीवर छापा मारला. ज्यानंतर एका टीमने गणेश ट्रान्सपोर्टवर छापा मारली. यांच्याकडे एक करोड रुपये सापडले. 

पियुष जैन यांच्या कपाटात होती एवढी रक्कम 

पियुष जैन यांच्या घरातील वेगवेगळ्या कपाटांमधून दीडशे कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही मोठी रक्कम होती. 23 रोजी सकाळपासून नोटांची मोजणी सुरूच होती. ती मोजणी काही थांबायचं नाव घेत नव्हती. 

24 तासांनंतर म्हणजे 24 डिसेंबरच्या सकाळपर्यंतही ते पूर्ण होऊ शकले नाही. इतके पैसे एकत्र मिळणे ही काही छोटी बाब नाही. आता हा केवळ जीएसटी चोरीचा मुद्दा नाही. तर एवढी रोकड रक्कम घरी सापडणं ही मोठी गोष्ट होती. 

पैसे मोजण्यासाठी मशिनची गरज 

पीयूष जैनच्या घरातून जप्त केलेली रक्कम मोजण्यासाठी डीजीजीआय आणि इन्कम टॅक्स टीमने नोट मोजण्याचे यंत्र मागवले. ज्यांची संख्या 18 वर पोहोचली आहे. 

मशिनमधून नोटा मोजल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा श्वास सुटू लागला. नोटांची ही सर्वात मोठी खेप सुरक्षित बँकेत नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी एक कंटेनर मागवला. मोठ मोठ्या बॅगेत पैसे भरून बँकेत नेण्यात आले.