बजेटच्या सादरीकरणाची ब्रीफकेस लाल रंगाचीच का बरं असते? कारणं अशी जी अनेकांना पटतीलच

Union Budget 2025: प्रत्येक वर्षी बजेटच्या सादरीकरणात एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरते, ती म्हणजे बजेटचा लाल रंगाचा पाउच किंवा ब्रीफकेस. पण ही ब्रीफकेस लाल रंगाचीच का बरं असते? या लाल रंगाला काय महत्त्व आहे? जाणून घ्या.  

Updated: Jan 30, 2025, 01:53 PM IST
बजेटच्या सादरीकरणाची ब्रीफकेस लाल रंगाचीच का बरं असते? कारणं अशी जी अनेकांना पटतीलच title=

Union Budget 2025 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हे बजेट जेवढे महत्त्वाचे असते, तवढेच त्याचे सादरीकरणही विशेष मानले जाते. लाल कपड्यात बजेट आणण्याची परंपरा फक्त भारतातच आहे असे नाही. जगातील इतर अनेक देशांमध्ये बजेट लाल कपड्यात किंवा ब्रीफकेसमध्ये सादर केले जाते. लाल रंगातील पाउचमध्ये बजेट सादर करण्याची परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु आहे.

लाल रंगाचे अर्थ

लाल रंग हा ऊर्जा, उत्साह, सौभाग्य, साहस आणि नवजीवनाचा प्रतीक मानला जातो. हा रंग नवसुरुवातीच्या संकल्पनांना दर्शवतो. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये याचा विशेष उपयोग केला जातो कारण हा रंग सकारात्मकता आणि शुभकार्याचे प्रतीक आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार लाल रंगाचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रात लाल रंगाला शक्ती, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढवणारा रंग मानले जाते. हा रंग माणसाच्या धैर्यात आणि दृढनिश्चयात वाढ करतो तसेच जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करतो.

हिंदू धर्मात लाल रंगाचे महत्त्व

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीसाठी रंगांचे महत्त्व दिले गेले आहे. विशेषतः लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. याशिवाय लाल रंग देवी दुर्गा, हनुमान आणि देवी लक्ष्मी यांचा आवडता रंग आहे. पूजाअर्चा आणि धार्मिक विधींमध्ये लाल रंगाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. शुभ प्रसंगी लावला जाणारा लाल टिळा शौर्य आणि विजयाचे प्रतीक आहे. नववधू लग्नाच्या वेळी लाल रंगाचा पेहराव करते कारण हा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

हे ही वाचा: Budget 2025 : भारताचा पहिला अर्थसंकल्प फक्त 197 कोटींचा, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत काय होती?

बजेटमध्ये लाल रंगाचा उपयोग का केला जातो?

बजेट सादर करताना लाल रंगाच्या पाउच किंवा ब्रीफकेसचा वापर केला जातो, कारण लाल रंग सामर्थ्य, स्थिरता आणि शक्तीचे प्रतीक आहे. हा रंग सूर्य, अग्नी आणि जीवनाशी निगडित आहे. जगभरातील विविध संस्कृतींमध्ये हा रंग संपत्ती, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे सरकार बजेट सादर करताना जनता आणि देशाच्या आर्थिक स्थितीला बळकट करण्याचा संदेश देते. असे म्हणता येईल.

(Disclaimer: सदर लेख ज्योतिष शास्त्रावर आणि सामन्या ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x